
आकर्षक व्याजदराचं आमिष दाखवून खारमधील एका प्रसिद्ध वकिलाला ५ जणांनी २४ लाखांना गंडा घातला. या प्रकरणी जुहू पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस अधिक तपास करत आहेत.
खार परिसरात राहणारे तक्रारदार वकिलांना आरोपी विरेंद्र विश्वदिया, दिव्यकांत विश्वदिया, तुषार पांचाळ, कमलेश पटेल, वासाराम वसावाधिया अशी या आरोपींची नावं आहेत. या आरोपींनी जेपीव्ही कॅपिटल्स इन्व्हेस्टमेंट नावाची कंपनी स्थापन केली होती. या कंपनीतील विविध गुंतवणूकीवर आकर्षक योजना ठेवल्या होत्या. या आरोपींनी तक्रारदार वकिलांना पैसे गुंतवणुकीवर अधिक व्याजदराचं आमिष दाखवून आपल्या जाळ्यात ओढलं. टप्याटप्यानं संबंधितांनी तक्रारदार वकिलाकडून तब्बल २४ लाख रुपये उकळले. एवढंच नव्हे तर खात्री पटावी यासाठी त्यांना गुंतणुकीची खोटी कागदपत्रही देण्यात आली होती.
त्यानंतर काही दिवसातच या आरोपींना कार्यालय बंद करून पळ काढल्याची माहिती वकिलाला मिळाली. आपली फसवणूक केल्या प्रकरणी वकिलानी जुहू पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.
हेही वाचा -
हिमालय पूल दुर्घटनेनंतर मुंबईतील पुलांच ऑडिट पुन्हा देसाईकडे
रेल्वे स्थानकावर लिंबू पाणी पिताय, तर आधी हे वाचा...
