सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी राजस्थानमधून एकाला अटक

आरोपीवर लॉरेन्स बिश्नोई टोळीचा प्रभाव असल्याचं बोललं जात आहे.

सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी राजस्थानमधून एकाला अटक
SHARES

युट्युबवरील व्हिडीओद्वारे (You Tube) अभिनेता सलमान खानला (Salman Khan) धमकी देणाऱ्या बावरीलाल गुजर यास मुंबई पाेलिसांनी अटक केली. 18 जून पर्यंत आरोपीस पोलिस कोठडीत ठेवण्यात येणार आहे.

मुंबई पोलिस (Mumbai Police) गुन्हा शाखेने बावरीलाल गुजर या 25 वर्षीय तरुणास राजस्थानमधून अटक केली आहे. युट्युबवरील ‘अरे छोडो यार’ या चॅनेलद्वारे प्रसारित झालेल्या व्हिडीओतू्न अभिनेता सलमान खानला धमकी दिल्याप्रकरणी त्याला अटक केली करण्यात आली आहे. गुजरला गुन्हा शाखेने मुंबईत आणले असून त्याला 18 जून पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्यात येणार आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, एका You Tube व्ह्युवरने या प्रकरणाची तक्रार केली आहे. ‘अरे छोडो यार’ या चॅनेलवरील संबंधित व्हिडीओमध्ये एक व्यक्ती हिंदी भाषेत गोल्डी ब्रार, विवेक भैय्या, रोहित, जितिन इ. टोळीतील सदस्यांची नावं घेतोय.

संबंधित व्यक्ती व्हिडीओमध्ये संवाद साधताना म्हणाला “राम राम मेरे सभी भाईयों …. आपण सर्व भाऊ आहोत. गोल्डी हा माझा भाऊ आहे, विवेक भैय्या, रोहित, जितिन हे सर्व मला भावासारखे आहेत. आमचा हेतू स्पष्ट होता. आम्हाला काय हवे आहे ते आम्ही सांगितले आहे. पण तरीही तो ऐकत नाही. तो अहंकारी आहे. तो स्वत:ला दबंंग किंग खान समजतो.”

धमक्या देत व्हिडिओ पुढे चालू ठेवत तो म्हणाला, “आज आम्ही एक सापळा रचला आहे, आणि आम्हाला माहित आहे की काय करावे आणि काय करू नये. त्याला वाय प्लस सुरक्षा असो की झेड प्लस. आम्ही घोषणा केली, म्हणजे आम्ही सांगितले असेल तर ते करू. जो कोणी आमच्याशी टक्कर देईल, आम्ही त्यांना संपवू. जय हिंद जय भारत.”

या व्हिडिओच्या आधारे, दक्षिण सायबर पोलिसांनी कलम 506(2) (गुन्हेगारी धमकी), कलम 504(शांतता भंग करण्याच्या हेतूने अपमान) आणि कलम 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला. भारतीय दंड संहिता (IPC), तसेच माहिती तंत्रज्ञान (IT) कायद्याच्या कलम ६६(d) (संगणक संसाधनाचा वापर करून फसवणूक) त्यानंतर हे प्रकरण तपासासाठी खंडणी विरोधी कक्षाकडे (एईसी) वर्ग करण्यात आले.

पोलिसांना (Police) मिळालेल्या पुराव्याच्या मदतीने त्याला अटक करण्यात आली. पोलिसांनी (Mumbai Police) आरोपीचा ईमेल आयडी आणि संपर्क क्रमांक तपासला. त्याद्वारे राजस्थानमधील त्याच्या घराचा पत्ता पोलिसांच्या हाती लागला. पोलिसांची टीम तात्काळ राजस्थानमधील बुंदी जिल्ह्यातील गुजरच्या घरी रवाना झाली.  पोलिसांच्या पथकाने त्याला वसतिगृहातून अटक केली.

न्यायालयीन कामकाजादरम्यान, तो टोळीच्या सदस्यांच्या संपर्कात होता की नाही? आणि तो गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईशी संबंधित आहे की नाही? याचा पोलिस तपास करत आहेत. गुन्हे शाखेने आरोपीच्या रिमांडची मागणी केली आहे. व्हिडिओ अपलोड करण्यामागचा त्याचा हेतू समजून घेणे, सलमान खान गोळीबार प्रकरणातील कोणत्याही सहभागाचा तपास करणे आणि त्याच्या मागील गुन्हेगारी रेकॉर्डचे परीक्षण करणे याचा तपासही पोलिस करत आहेत.



हेही वाचा

दादरचा फूटपाथ पालिकेनं नव्हे, तर चोरांनी खोदला!

पालघरमध्ये तरुणाकडून गर्लफ्रेंडची निर्घृण हत्या

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा