हिमालय पूल दुर्घटना : स्ट्रक्चरल ऑडिटर नीरजकुमार देसाईला अटक

महापालिकेच्या मुख्यालयापासून जवळ असलेला हिमालय पूल गुरूवारी सायंकाळी कोसळला. या दुर्घटनेत ६ जणांचा मृत्यू झाला. तर ३१ जण जखमी झाले. याप्रकरणी पोलिसांनी आझाद मैदान पोलिसांत कलम ३०४ (अ) ३३७ व ३३८ अंतर्गत हा गुन्हा नोंदवला होता.

हिमालय पूल दुर्घटना : स्ट्रक्चरल ऑडिटर नीरजकुमार देसाईला अटक
SHARES

सीएसटीमटी येथील हिमालय पूल दुर्घटनेप्रकरणी स्ट्रक्चरल ऑडिटर नीरजकुमार देसाईला अटक करण्यात आली आहे. सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करत नीरजकुमार देसाईवर कारवाई करण्यात आली आहे. देसाईवर चुकीचा अहवाल दिल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. 


डागडुजीबाबत चुकीची माहिती

महापालिकेच्या मुख्यालयापासून जवळ असलेला हिमालय पूल गुरूवारी सायंकाळी कोसळला. या दुर्घटनेत ६ जणांचा मृत्यू झाला. तर ३१ जण जखमी झाले. याप्रकरणी पोलिसांनी आझाद मैदान पोलिसांत कलम ३०४ (अ) ३३७ व ३३८ अंतर्गत हा गुन्हा नोंदवला होता. पूलाच्या ऑडिटचे काम दिलेल्या कंपनीचे संचालक निरज देसाईला सोमवारी अटक करण्यात आली.  पूलाच्या डागडुजीबाबत चुकीची माहिती देेेत, दुर्घटनेस कारणीभूत ठरल्याप्रकरणी देसाईला अटक केल्याची माहिती पोलिस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांनी ही माहिती पत्रकार परिषदेत दिली. या प्रकरणात मोठा भ्रष्टाचार झाला असून अटक आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे.


अहवाल सादर 

 या दुर्घटनेचा अहवाल २४ तासात सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्यानंतर शुक्रवारी पालिकेने या दुर्घटनेचा अहवाल सादर केला. डीडी देसाई असोसिएट इंजिनिअर कन्सलटन्सी अँड अॅनालिस्लाट प्रा. लिमिटेड कंपनीला आॅडिटचे काम दिले होते. या कंपनीने या पूलाची किरकोळ दुरूस्ती सूचवून पूल पादचाऱ्यांच्या रहदारीसाठी धोकादायक नसल्याची चूकीची माहिती पालिकेला दिली असं अहवालात म्हटलं आहे. या प्रकरणी सोमवारी पोलिसांनी घरी धाड टाकत निरज देसाईला अटक केली.


काय म्हटलंय अहवालात

२०१७-१८ या वर्षाच्या पूलाचे ऑडिटचे काम पालिकेचे एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर ए.आर. पाटील यांच्या देखरेखीखाली झाले. तर २०१३-१४ साली या पूलाच्या दुरूस्तीचे काम असिस्टंट इंजिनिअर एस.एफ. ककुलते यांच्या देखरेखीखाली झाले. या कामाला निवृत्त  पालिकेचे इंजिनिअर एस.ओ. कोरी आणि त्यांचे असिस्टंट आर.बी तारे यांनी मान्यता दिली असल्याचे अहवालात म्हटलं आहे. तसंच या प्रकरणी कंत्राटदार आर.पी.एस. इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी ही तितकीच दोषी असल्याचे अहवालात म्हटलं असून पालिकेने या कंपनीला ही शो काॅज नोटिस पाटवत तिचे नाव काळ्या यादीत नोंदवले आहे.



हेही वाचा - 

हिमालय पूल दुर्घटनेची न्यायालयीन चौकशी करा; रवी राजा यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र




Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा