पैसे घेऊन पोलिस अधिकाऱ्यांची बदली करून देणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

 Mumbai
पैसे घेऊन पोलिस अधिकाऱ्यांची बदली करून देणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
Mumbai  -  

पैसे घेऊन पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या करून देणाऱ्या एका टोळीला मुंबई पोलिसांच्या गुन्हे विभाग शाखेने पकडले आहे. या टोळीत 4 जण असून, विद्यासागर हिरमुखे,किशोर माळी,विशाल ओंबळे आणि रवींद्रसिंग मोहब्बत सिंग यादव उर्फ शर्मा अशी त्यांची नावे आहेतं. यातील विद्यासागर हिरमुखे महानंदा दूध डेअरिचा जनरल मॅनेजर (अकाउंट आणि वित्त विभाग) तर किशोर माळी हा एका राजकीय नेत्याचा स्वीय सहाय्यक असल्याची माहिती अधिक तपासात समोर आली आहे.

सोलापूर येथील पोलिस उपायुक्त नामदेव चव्हाण यांना तुमची बदली चांगल्या ठिकाणी करून देतो त्यासाठी पैसे लागतील असे या चौघांकडून सांगण्यात आले.

याबात चव्हाण यांनी आपल्या वरिष्ठांना माहिती देताच त्यांनी मुंबई गुन्हे शाखेतील पोलिस अधिकाऱ्यांशी संपर्क साधून याची माहिती त्यांना दिली. चव्हाण यांना या टोळक्याने गुरूवारी विलेपार्ले येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये बोलावले होते. त्याप्रमाणे चव्हाण या चौघांना हॉटेलमध्ये जाऊन भेटले आणि त्यांच्यामध्ये सुरू असलेले संभाषण त्यांनी आपल्या छुप्या कॅमेऱ्यात कैद करून, गुन्हे शाखेच्या मदतीने सापळा रचत या चौघांना रंगेहात पकडून दिले. या टोळक्याने आजवर कुणाच्या बदल्या पैसे घेऊन केल्या आहेत. तसेच या मागील खरा सूत्रधार कोण? याचा शोध आता पोलिस घेत आहेत. यातील एक आरोपी पुणे आणि एक आरोपी दिल्लीतील असल्याची माहितीही समोर आली आहे.

Loading Comments