पोलिसांची डोकेदुखी वाढणार? आॅर्केस्ट्राचंही आता डान्स बारमध्ये रूपांतर

सर्वोच्च न्यायालयानं तिकडे डान्स बार सुरू करायला परवानगी दिल्याबरोबर इकडे मुंबई पालिसांची डोकेदुखी आता चांगलीच वाढायला सुरूवात झाली आहे. कारण डान्स बार हे गुन्ह्यांचं एक केंद्र असल्यानं आता पुन्हा डान्स बार सुरू होणार असल्यानं मुंबईतील गुन्ह्यांमध्येही वाढ होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

पोलिसांची डोकेदुखी वाढणार? आॅर्केस्ट्राचंही आता डान्स बारमध्ये रूपांतर
SHARES

सर्वोच्च न्यायालयानं तिकडे डान्स बार सुरू करायला परवानगी दिल्याबरोबर इकडे मुंबई पालिसांची डोकेदुखी आता चांगलीच वाढायला सुरूवात झाली आहे. कारण डान्स बार हे गुन्ह्यांचं एक केंद्र असल्यानं आता पुन्हा डान्स बार सुरू होणार असल्यानं मुंबईतील गुन्ह्यांमध्येही वाढ होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यातही डान्स बार बंद झाल्यापासून मुंबईत साधारणत ४०० हून अधिक ठिकाणी आॅर्केस्ट्राच्या नावाखाली डान्स बार सुरू होते. आता मात्र या आॅर्केस्ट्रांचं डान्स बारमध्ये रूपांतर करणं सोपं होणार आहे. त्यामुळे डान्स बारची संख्याही वाढणार असून यातून गुन्हेगारीही वाढण्याची भिती एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने मुंबई लाइव्हशी बोलताना व्यक्त केली आहे.


आॅर्केस्ट्राच्या नावाखाली डान्सबार

दहा वर्षांपूर्वी मुंबईत डान्स बारला चांगलंच उधाण आलं होतं. डान्स बारमुळे शहरी भागांमध्ये गुन्ह्यांचं प्रमाण खूपच वाढ होतं, अनेक प्रकरणातून हे सिद्धही झालं होतं. तर त्याचवेळी कित्येक संसारही डान्स बारमुळे उद्धवस्त झाले होते. ही गंभीर बाब लक्षात घेता तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी डान्स बारवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. मात्र या निर्णयामुळे अनेकांच्या पोटावर पाय आल्याचं म्हणत डान्स बारमालकांनी न्यायालयात धाव घेतली. दरम्यान राज्य सरकारने डान्स बारएेवजी आॅर्केस्ट्राला परवानगी दिल्यानंतर बार-डान्स बार मालकांनी आॅर्केस्ट्रा बारच्या नावाखाली चोरीछुपे डान्स बार सुरूच ठेवले.


गुन्हेगारी वाढणार

या आॅर्केस्ट्रा बारमध्ये महिला गायिका ठेवण्याची मुभा दिली आहे. मात्र प्रत्यक्षात महिला गायिकांएेवजी बारबालांचा वापर आॅर्केस्ट्रा बारमध्ये केला जात आहे. पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी या बारमालकांनी बारमध्ये छुप्या खोल्या बनवल्या आहेत. पोलिस कारवाईसाठी आले की बारबालांना या छुप्या खोल्यांमध्ये लपवलं जातं. पण आता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर आॅर्केस्ट्रा बारचं रूपांतर सहजपणे डान्स बारमध्ये करता येणार आहे. सर्वोच्च न्यायालयानं अनेक अटी शिथिल केल्यानं आता डान्स बार सुरू होणार असून त्यात आॅर्केस्ट्राच्या रूपानं आणखी डान्स बारची भर पडण्याची शक्यता आहे. अशावेळी मुंबईतील गुन्हेगारीचं प्रमाणही आता वाढण्याची भिती पोलिसांकडून व्यक्त होत आहे. तर मनुष्यबळ कमी असल्यानं हे नवं आव्हान आता कसं पेलायचं असा प्रश्न पोलिसांसमोर उभा ठाकल्याचंही या अधिकाऱ्याने सांगितलं आहे.हेही वाचा -

सावधान! जस्ट डाईलवर नंबर शोधणं 'असं' पडू शकतं महागात

बटाट्याच्या चाळीत ‘भाई’ उत्तरार्धचा ट्रेलर लाँचसंबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा