सावधान! जस्ट डाईलवर नंबर शोधणं 'असं' पडू शकतं महागात

जस्ट डाइलवर काही क्षणांतच हवा तो नंबर मिळत असल्यानं मोठ्या संख्येनं जस्ट डायलला पसंती देतात. पण मुंबईकरांनो, जस्ट डायल वेबसाईटची मदत घेत असाल तर सावधान!

सावधान! जस्ट डाईलवर नंबर शोधणं 'असं' पडू शकतं महागात
SHARES

कुठलाही एखादा दुरध्वनी क्रमांक अगदी हाॅटेल, थिएटरपासून, एखाद्या व्यक्तिचा मोबाईल नंबर हवा असेल तर तो मिळवणं आता एकदम सोप झालं आहे ते जस्ट डायलमुळे. जस्ट डाइलवर काही क्षणांतच हवा तो नंबर मिळत असल्यानं मोठ्या संख्येनं जस्ट डायलला पसंती देतात. पण मुंबईकरांनो, जस्ट डायल वेबसाईटची मदत घेत असाल तर सावधान! कारण जस्ट डायलवरून दुरध्वनी क्रमांक शोधणं तुम्हाला चांगलंच महागात पडू शकत. बोरिवलीतील ४३ वर्षीय एका व्यक्तीची फसवणूक झाली असून त्यांना तब्बल ४४ हजार ९९९ रुपयांचा गंडा बसला आहे. सायबर चोरट्यांनी जस्ट डायलवर आपले नंबर अपलोड केले असून मदतीसाठी त्या नंबरवर फोन केल्यास चुकीची माहिती देत हे सायबर चोरटे नागरिकांची फसवणूक करत त्यांना गंडवतात आणि हेच या व्यक्तीबरोबर झाल्याचं आता समोर आलं आहे.


जस्ट डायलवर सायबर चोरट्यांचे नंबर

बोरिवलीच्या शिंपोली रोड इथं राहणारे भाविन छेडा हे शेअर मार्केटचं आॅनलाईन काम करतात. ७ जानेवारी रोजी छेडा यांनी पेटिएम हे अॅप डाऊन लोड केले. पेटीएममध्ये त्यांनी पत्नीच्या न्यू इंडिया बँकेच्या खात्यातून शंभर रूपये बॅलन्स भरण्याचा प्रयत्न केला.बँकेतून व्यहार झाला खरा, पण पेटीएममध्ये ते पैसे जमा न झाल्याने छेडा यांनी पेटीएम कस्टमर केअरचा नंबर तपासला. छेडा यांना नंबर न मिळाल्यानं त्यांनी गुगलच्या जस्ट डाइल या वेबसाइटवरून पेटीएम कंपनीच्या कस्टमर केअरशी संपर्क साधला.

त्यावेळी समोरील हरीष शर्मा नावाच्या व्यक्तीनं गुगल प्ले स्टोरवरील पे अॅप डाऊनलोड करण्यास सांगितले. तसेच त्या अॅपवरील सर्व माहितीही भरण्यास सांगितली. त्याचबरोबर बँकचे डेबीट कार्ड नंबर, सीव्हीव्ही क्रमांक, इक्सपायरी दिनांक ही भरण्यास सांगितली.ही माहिती भरताच छेडा यांच्या मोबाइलवर त्यांच्या खात्यावरून २० हजार रुपये काढण्यात आल्याचे मॅसेज आला. हरीष फसवणूक करत असल्याचे लक्षात आल्यानंतर छेडाने हरीषला पोलिसांत तक्रार करण्याची भिती दाखवली. मात्र हरीषने छेडाला न जुमानता वारंवार पैसे काढत तब्बल ४४ हजार ९९९ रुपये काढले.


तक्रार दाखल

या प्रकरणी छेडा यांनी बोरिवली पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली असून पोलिस अधिक तपास करत आहेत.पोलिस तपासात जस्ट डाईलवरील तो नंबर कंपनीचा नसून चोरट्यांनी स्वतःचा नंबर अपलोड केल्याचं निदर्शनास आलं आहे. अशा प्रकारे या सायबर चोरट्यांनी अनेकांची फसवणूक केली असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्ती केली. काही दिवसांपूर्वी अशाच प्रकारे मालाडमधील एका मुख्याध्यापक महिलेच्या खात्यावरून चोरट्यांनी १ लाख२० हजार रुपये काढले होते. त्यामुळेच गुगलवरून कोणतीही माहिती मिळवताना काळजी घ्यावी, अनोळखी व्यक्तीला आपल्या बँकेची किंवा इतर गुप्त माहिती शेअर करू नका.असे आवाहन पोलिसांनी केले आहे.



हेही वाचा -

कोकेन विकणाऱ्या दोन परदेशी नागरिकांना अटक

माटुंग्यातील व्यावसायिकाला कोट्यावधी रुपयांचा गंडा घालणारे अटकेत



Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा