आमदाराची हरवलेली बॅग २४ तासात शोधली

लोखंडवाला यांनी प्रवास केलेली टॅक्सी ज्या मार्गावरून गेली त्या मार्गावरच्या सर्व सीसीटिव्हींची पडताळणी पोलिसांनी केली. एवढेच नव्हे तर टॅक्सीचा नंबर मिळवत आरटीओकडून टॅक्सी मालकाचा नाव, पत्ता मिळवला.

आमदाराची हरवलेली बॅग २४ तासात शोधली
SHARES

मुंबईत प्रवासावेळी टॅक्सीत बॅग विसरलेले माजी आमदार सोहेल लोखंडवाला यांची बॅग २४ तासांत पोलिसांनी शोधून काढली. या बॅगेत सोहेल यांची महत्वाची कागदपत्रे होती. शेकडो सीसीटिव्ही तपासून पायधुनी पोलिसांनी ही बॅग शोधून काढली. 


पोलीस ठाण्यात तक्रार

माजी आमदार सोहेल लोखंडवाला हे काही कामानिमित्त टॅक्सीतून प्रवास करत होते. त्यावेळी घाई गडबडीत असताना ते आपली बॅग टॅक्सीत विसरले. उतरल्यानंतर काही वेळाने टॅक्सीमध्ये बॅग विसरल्याचं सोहेल यांच्या लक्षात आलं. त्यानंतर त्यांनी पायधुनी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली.


सीसीटिव्हींची पडताळणी 

 पोलिसांनी याची तातडीनं दखल घेत तपासाला सुरूवात केली. लोखंडवाला यांनी प्रवास केलेली टॅक्सी ज्या मार्गावरून गेली त्या मार्गावरच्या सर्व सीसीटिव्हींची पडताळणी पोलिसांनी केली. एवढेच नव्हे तर टॅक्सीचा नंबर मिळवत आरटीओकडून टॅक्सी मालकाचा नाव, पत्ता मिळवला. त्यानंतर या टॅक्सीच्या इन्शुरन्सची माहिती घेऊन टॅक्सी मालकाचा मोबाइल क्रमांक मिळवला. त्यानंतर सदरची टॅक्सी शोधून काढण्यात आली व  हरवलेले कागदपत्र टॅक्सी ड्रायव्हर अनिल मोरया यांच्याकडून  चेंबूर येथील वाशी नाका येथून ताब्यात घेण्यात आले.   सर्व कागदपत्रे वरिष्ठांच्या परवानगीनं माजी आमदार सोहेल लोखंडवाला यांना परत करण्यात आली. सोहेल यांनी कारवाईत सहभागी झालेले पोलिस निरीक्षक गायकवाड, सपोनि भंडारे व उपनिरीक्षक पवार व गुन्हे प्रकटीकरण पथकाच्या कामगिरीचं कौतुक केलं.



हेही वाचा -

मुंबईत पालिकेनं हटवली ९ हजारपेक्षा अधिक बेकायदा होर्डिंग



संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा