नायझेरियन तस्कर ठरतायत पोलिसांची डोकेदुखी


नायझेरियन तस्कर ठरतायत पोलिसांची डोकेदुखी
SHARES

नशेचा अंमल शहराच्या कानाकोपऱ्यात पोहचवणाऱ्या नायझेरियन तस्करांमुळे पोलिसांची डोकेदुखी दिवसेंदिवस वाढतच आहे. रविवारी या तस्करांनी कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांनाच दगडाने ठेचून मारण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विभागाने आता या नायझेरियन तस्करांची धरपकड सुरू केली आहे. मागील पाच महिन्यांत पोलिसांना ६ परदेशी तस्करांना अटक करण्यात यश आलं आहे.


तस्करांची वाढती मक्तेदारी


मुंब्रा, दिवा, मिरारोड, वसई आणि नवी मुंबईतील काही भागांत मोठ्या संख्येने वास्तव्यास असलेल्या नायझेरीयन नागरिकांच्या गुन्हेगारी विषयक हालचाली रोखण्याचे नवे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे. या नायझेरीयन नागरिकांनी एमडी आणि एफेड्रीन, अशा अनेक नव्या अमली पदार्थांची तस्करी भारतात सुरू केल्यानं त्या अमली परार्थांची पडताळणी करताना पोलिसांच्या नाकीनऊ येत आहेत.
बेकायदेशीरपणे भारतात प्रवेश करणारे ९५ टक्के नायझेरियन ऑनलाईन फसवणूक आणि अमली पदार्थांची तस्करी करतात. विशेष म्हणजे नायझेरियन नागरिक शिक्षणासाठी किंवा टुरिस्ट म्हणून व्हिसा मिळवतात आणि भारतात येतात. त्यांच्या देशात असलेल्या गरीबीमुळे मायदेशात परत पाठवलं जाऊ नये म्हणून भारतात आल्यानंतर ते आपले पासपोर्ट आणि इतर कागदपत्रं फाडून टाकतात. त्यामुळे भारतात पोलिसांनी त्यांना पकडलं आणि मायदेशात पाठवण्याचा प्रयत्न केला, तर बिना पासपोर्ट आणि इतर कागदपत्रांमुळे त्या नायझेरियन तस्करांना त्यांचा देश स्वीकारत नाही.


महिन्याभरापासून पोलिसांच्या ताब्यात

अटकेत असलेल्या अनेक नायझेरियन आरोपींच्या जिभेचे चोचलेही तितकेच असतात. नुकतीच जुहू पोलिसांना याचा अनुभव आला होता. जुहू पोलिसांनी एका नायझेरियन आरोपीला डिपोर्ट करण्यासाठी ताब्यात घेतलं होतं. मात्र त्या आरोपीला त्याचा देश स्वीकारत नसल्यामुळे महिन्याभरापासून तो पोलिसांच्या ताब्यात होता.

त्यावेळी त्या आरोपीला भारतीय जेवण पचत नसल्यायने त्याला चायनीज आणि तंदुरी देत पोलिसांचे खिसे रिकामी झाले होते. तर हल्ली अटकेत असलेल्या नायझेरियन तस्तकांच्या सुटकेसाठी भारतीय तस्कर पुढे येत आहेत. यातील काही नायझेरियन लग्न करून भारतात स्थायिकही झाले आहेत. दिवसेंदिवस वाढत असलेल्या या नायझेरियन तस्करांच्या व्याप्तीमुळे पोलिसांची डोकेदुखीत वाढ झाली आहे. त्यामुळे या नायझेरियन तस्तरांविरोधात पोलिसांनी आता कंबर कसली असून त्यांची धरपकड करण्यास सुरुवात केली आहे.


अटक तस्करांची आकडेवारी

  • २०१५ मध्ये ३१ नायझेरियन तस्करांवर गुन्हा नोंदवला असून ३८ आरोपींना अटक केली
  • २०१६ मध्ये १७ नायझेरियन तस्करांवार गुन्हा नोंदवला असून २३ जणांना अटक केली
  • २०१७ मध्ये१४ नायझेरियन तस्करांवार गुन्हा नोंदवला असून २९ जणांना अटक केली
  • २०१८ मध्ये ६ नायझेरियन तरुणांवर गुन्हा नोंदवला असून ६ जणांना अटक केली
Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा