शहरी गुन्हेगारीत मुंबईचा १६ क्रमांक

एनसीआरबीच्या अहवालानुसार देशात २०१८ मध्ये भारतीय दंड संहितेसह पॉक्सोसारख्या विशेष कायद्यान्वये देशातल्या १९ महानगरांमध्ये आठ लाख दोन हजार २६७ गुन्ह्यंची नोंद झाली.

शहरी गुन्हेगारीत मुंबईचा १६ क्रमांक
SHARES

देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईत कुठलही घटना घडली, की मुंबई असुरक्षित असल्याचा नारा देत पोलिसांच्या कार्यक्षमतेवर बोट दाखवली जातात. मात्र नॅशनल क्रिम रेकाँर्ड ब्युरोने नुकतेच जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार मुंबईपेक्षा देशातील कोची, दिल्ली, सूरत, जयपूर ही शहरे असुरक्षित असून त्या यादीत मुंबईचा १६ नंबर आहे.

देशातील प्रमुख महत्वाच्या शहरांमधील वाढलेल्या २०१८ सालातील गुन्ह्यांच्या आकडेवारी एनसीआरबीने जाहिर केली. एनसीआरबीच्या अहवालानुसार देशात २०१८ मध्ये भारतीय दंड संहितेसह पॉक्सोसारख्या विशेष कायद्यान्वये देशातल्या १९ महानगरांमध्ये आठ लाख दोन हजार २६७ गुन्ह्यंची नोंद झाली. लोखसंख्येच्या तुलनेत १९ महानगरांमध्ये दर लाख लोकसंख्येमागे ७०४ गुन्हे सरासरी घडले. मुंबईत हे प्रमाण ३०९ इतके नोंदवण्यात आले आहे. तर कोचीत दर लाख लोकसंख्येमागे २५८१, दिल्लीत १४५७, सुरतेत १३१७, जयपूरमध्ये १०६५, चेन्नईत ९७८, इंदूर येथे ९५५ गुन्हे घडले. विशेष म्हणजे मुंबईत २०१७च्या तुलनेत १३८३ गुन्हे कमी नोंद झाले.

हिंसक गुन्हे, महिलांविरोधी गुन्हे, ज्येष्ठ नागरिक आणि बालकांविरोधातील गुन्हे, सायबर गुन्हे आदींमध्ये मुंबईत नोंद गुन्ह्य़ांची संख्या जास्त असली तरी गुन्ह्य़ांचे प्रमाण मात्र सरासरीपेक्षा फारच कमी असल्याचे ही आकडेवारी सांगते. तर गंभीर आणि हिसंक गुन्ह्यांमध्ये मुंबईचे प्रमाण ३३ इतके आहे.

संबंधित विषय