माहिममध्ये एका सुटकेसमध्ये मृतदेह आढळल्याने खळबळ

त्या बॅगेत मानवी मृतदेहाचे तुकडे असल्याचे पुढे आल्यानंतर एकच खळबळ उडाली. त्यानंतर पोलिसांनी फाँरेन्सिकच्या मदतीने मृतदेहाची तपासणी केली. पोलिसांनी या प्रकरणी हत्येचा गुन्हा नोंदवला असून पोलिस अधिक तपास करत आहेत.

माहिममध्ये एका सुटकेसमध्ये मृतदेह आढळल्याने खळबळ
SHARES

माहिम समुद्रकिनारी सोमवारी एका सुटकेसमध्ये मृतदेहाचे तुकडे मिळाल्याने एकच खळबळ उडाली आहे. बॅगत आढळलेला मृतदेह हा पुरूषाचा असल्याचे पोलिसांनी सांगितले. मृतदेह असलेल्या बॅगबाबतची माहिती स्थानिक मच्छिमारांनी पोलिसांना दिली. या प्रकरणी माहिम पोलिस ठाण्यात हत्येचा गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलिस अधिक तपास करत आहेत.

माहिमच्या समुद्र किनारी आढळून आलेल्या या बॅगेतून मोठ्या प्रमाणात दुर्गंधी येत होती. त्यामुळे स्थानिक मच्छीमारांनी या बॅगेची माहिती पोलिस नियंत्रण कक्षाला दिली. त्यानुसार माहिम पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिस तपासात त्या बॅगेत मानवी मृतदेहाचे तुकडे असल्याचे पुढे आल्यानंतर एकच खळबळ उडाली. त्यानंतर पोलिसांनी फाँरेन्सिकच्या मदतीने मृतदेहाची तपासणी केली. पोलिसांनी या प्रकरणी हत्येचा गुन्हा नोंदवला असून पोलिस अधिक तपास करत आहेत. तर मृतदेह शवविच्छेदनासाठी सायनच्या लोकमान्य टिळक रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिस परिसरातील सर्व सीसीटिव्ही तपासत आहेत. तसेच मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी शहरातील सर्व पोलिस ठाण्यात नोंदवण्यात आलेले मिसिंग रिपोट तपासत आहेत.   

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा