शाहरुख खानला धमकीचा फोन

शाहरुख खानच्या वांद्रे येथील घराबाहेर पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे

शाहरुख खानला धमकीचा फोन
SHARES

सलमान खाननंतर बॉलिवूडमधील आणखी एका अभिनेत्याला धमकीचा (threat) फोन (call) आला आहे. शाहरुख खानला (shah rukh khan) जीवे मारण्याची धमकी देणारा व्यक्तीचा फोन वांद्रे पोलीस ठाण्यात आला आहे. तसेच धमकी देणाऱ्या व्यक्तीने 50 लाख रुपयांची मागणी केली आहे.

पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम 308(4) आणि 351 (3)(4) अंतर्गत मंगळवारी संध्याकाळी मिळालेल्या धमकीच्या संदर्भात खंडणी आणि गुन्हेगारी धमकीशी संबंधित एफआयआर नोंदवला आहे. या प्रकरणातील तपासात पोलिसांना धमकी देणाऱ्या युवकाचा शोध लागला आहे. या युवकाचे नाव फैजान खान असून तो रायपूर, छत्तीसगढ येथील राहणारा आहे.

सध्या, रायपूरमधील स्थानिक पोलिसांच्या मदतीने धमकी देणाऱ्या व्यक्तीला पकडण्यासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत. दरम्यान, पोलिसांनी शाहरुख खानच्या वांद्रे येथील घराबाहेर सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे.

गेल्या महिन्यात, मुंबई (mumbai) पोलिसांना अभिनेता सलमान खानबद्दल धमकीचे कॉल आणि संदेश आले होते. यात लॉरेन्स बिश्नोई टोळी सामील असल्याचे समजले होते. या टोळीने काही महिन्यांपूर्वी सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार देखील केला होता.



हेही वाचा

मुंबईत 420 उमेदवार निवडणुक लढवणार

अमित ठाकरेंनंतर भाजपाचा मनसेच्या या उमेदवाराला पाठिंबा

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा