मुंबईतील (mumbai) एका 19 वर्षीय व्यक्तीचा झोपेत चालत असताना इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून पडून दुर्दैवी मृत्यू झाला. रविवारी पहाटे पाचच्या सुमारास दक्षिण मुंबईतील (south mumbai) माझगाव (Mazgaon)परिसरातील नेस्बिट रोडवरील ॲक्वा जेम टॉवर येथे सुमारे पहाटे 5 वाजता ही घटना घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुस्तफा इब्राहिम चुनावाला हे इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर पडलेले आढळले. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून त्या व्यक्तीला सैफी हॉस्पिटलमध्ये नेले, तेथे पोहोचण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
मुस्तफा चुनावाला 'सोमन्यांम्ब्युलिझम' हा झोपेत चालण्याचा आजार आहे. सामान्यत: या आजाराला स्लीपवॉकिंग (Sleepwalking)असे म्हणतात. भायखळा (byculla) पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून तपास सुरू आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
हेही वाचा