मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईदला अटक

मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड कुख्यात दहशतवादी आणि जमात-उद-दावा संघटनेचा प्रमुख हाफिज सईदला पाकिस्तामधील लाहोरमध्ये बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईदला अटक
SHARES

मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड कुख्यात दहशतवादी आणि जमात-उद-दावा संघटनेचा प्रमुख हाफिज सईदला पाकिस्तामधील लाहोरमध्ये बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. लाहोरहून गुजरानवाला इथं जात असताना पंजाब प्रांतातील दहशतवादविरोधी पथकानं हाफिजला अटक केली. एका बाजूला भारतानं जागतिक पातळीवर दहशतवादाविरोधात निर्माण केलेल्या दबावाचं हे यश मानलं जात आहे. तर दुसऱ्या बाजूला हा कारवाईचा निव्वळ फार्स असल्याचंही म्हटलं जात आहे. 

दहशतवादी कारवायांसाठी पैसे पुरवल्याच्या आरोपाखाली त्याला अटक करण्यात आली आहे. अटकेनंतर हाफिजची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. या अटकेविरोधात न्यायालयात जाणार असल्याचं त्यानं म्हटलं आहे. 

सद्यस्थितीत आर्थिकदृष्ट्या खचलेल्या पाकिस्तानला फायनांन्शियल अॅक्शन टास्क फोर्स (FTF) च्या ब्लॅकलिस्टमध्ये नाव येण्याची भीती सतावत आहे. पाक सरकारनं त्यांच्या देशातील दहशतवादी संघटना व व्यक्तींवर ठोस कारवाई करावी, यासाठी जागतिक वित्तीय संस्थांकडून प्रचंड दबाव येत आहे. त्यामुळे  कुठल्याही स्वरूपातील आर्थिक निर्बंध येऊ नये म्हणून पाकिस्तानला स्वत: पोसत असलेल्या  दहशतवाद्यांवर नाईलाजाने कारवाई करावी लागत आहे.

त्यातच पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान लवकरच अमेरिकेचा दौरा करणार आहेत. म्हणूनच भारतासाठी आपली हवाई हद्द सुरू करणे तसंच सईदला अटक करण्याची कारवाई केल्याचं म्हटलं जात आहे.


हेही वाचा-

६ कोटींच्या कोकेनसह नायजेरियन तस्कराला अटक

पोलिस कारवाई रोखण्यासाठी तरुणांनी केले पोलिसाचेच अपहरणसंबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा