६ कोटींच्या कोकेनसह नायजेरियन तस्कराला अटक

मूळचा दक्षिण अफ्रिकेचा रहिवाशी असलेला बोनाव्हेचूर कोकेनसह अन्य महागड्या ड्रग्जची तस्करी करतो. भारतात कोकेनला मोठी मागणी असल्यामुळे तो काही महिन्यांपासून भारतात तस्करी करत होता.

६ कोटींच्या कोकेनसह नायजेरियन तस्कराला अटक
SHARES

मुंबईच्या अंमली पदार्थ विभागाने परदेशातून अंमली पदार्थांची तस्करी करण्यासाठी आलेल्या नायजेरियन तस्कराला ६ कोटी रुपयांच्या अंमली पदार्थासह अटक केली आहे. बोनाव्हेचूर एनझुवेचुक्कू एनवुडे असे या तस्कराचे नाव असून न्यायालयाने त्याला २२ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली असल्याची महिती पोलिस उपायुक्त शिवदीप लांडे यांनी दिली.   


१ किलो कोकेन हस्तगत

मूळचा दक्षिण अफ्रिकेचा रहिवाशी असलेला बोनाव्हेचूर कोकेनसह अन्य महागड्या ड्रग्जची तस्करी करतो. भारतात कोकेनला मोठी मागणी असल्यामुळे तो काही महिन्यांपासून भारतात तस्करी करत होता. याची माहिती मुंबईच्या अंमली पदार्थ विभागाचे पोलिस उपायुक्त शिवदीप लांडे यांना मिळाल्यानंतर बोनाव्हेचूरचा पाठलाग पोलिसांनी सुरू केला. त्यावेळी बोनाव्हेचूरहा वांद्रे येथे मोठ्या ड्रग्जची डिल करण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार लांडे यांनी खार परिसरात वांद्रे युनिटच्या मदतीने सापळा रचला. न्यू लिंक रोडवरील सरदार राजेंद्रसिंग आनंद चौक परिसरात बोनाव्हेचूर संशयास्पद फिरत असताना त्याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्यावेळी त्याच्याजवळ १ किलो २०  ग्रॅम वजनाचे उच्च प्रतीचे कोकेन सापडले. आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत ६ कोटी १२ लाख रुपये आहे.


कोपरखैरणेत वास्तव्य

टुरिस्ट व्हिसावर भारतात आलेला बोनाव्हेचूर हा सध्या नवी मुंबईतील कोपरखैरणेत भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहत होता. कोकेन तस्करी करणारी ही आंतरराष्ट्रीय टोळी असून या टोळीतील इतर सदस्यांच्या अटकेसाठी आता पोलिसांनी शोधमोहीम सुरु केली आहे. एनडीपीएस कलमांतर्गत अटक केल्यानंतर त्याची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली.



हेही वाचा -

डोंगरी दुर्घटनेनंतर म्हाडा प्रमुखांची बदली

पोलिस कारवाई रोखण्यासाठी तरुणांनी केले पोलिसाचेच अपहरण




Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा