Advertisement

म्हाडा मुंबई मंडळाच्या मुख्य अधिकाऱ्यांची बदली

राज्य सरकारकडून महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणा (MHADA)च्या मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी दीपेंद्र सिंह कुशवाह यांची बदली करण्यात आली आहे.

म्हाडा मुंबई मंडळाच्या मुख्य अधिकाऱ्यांची बदली
SHARES

डोंगरी परिसरातील केसरबाई इमारतीचा काही भाग मंगळवारी कोसळून त्यात आतापर्यंत १४ जणांचा मृत्यू झाला असून ९ जण गंभीर जखमी आहेत. त्यापाठोपाठ महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणा (MHADA)च्या मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी (CO) दीपेंद्र सिंह कुशवाह यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) बी. राधाकृष्णन यांची नेमणूक करण्यात आली आहे.   

२५ इतर सनदी अधिकाऱ्यांचीही बदली

राज्य सरकारने दीपेंद्र सिंह कुशवाह यांच्यासोबत २५ इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांची देखील नियमीत बदली केली आहे. नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांची मुंबईच्या कामगार आयुक्तपदावर नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या जागी ए. बी. मिसाळ नवी मुंबई महानगरपालिकेचे नवे आयुक्त होतील. मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांची बदली मुख्यमंत्री कार्यालयात सचिवपदी करण्यात आली आहे.  

मुंबई उपनगरच्या जिल्हाधिकारीपदाची जबाबदारी पालघर जिल्हा परिषदेचे सीईओ मिलिंद बोरीकर यांना देण्यात आली आहे. मंत्रालयातील सामान्य प्रशासन विभागाचे सचिव आणि विशेष चौकशी अधिकारी शिवाजी दौंड यांना कोकण किभागीय आयुक्तपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. मुंबईचे कामगार आयुक्त आर. आर. जाधव यांची मत्स्य विभागाच्या आयुक्तपदी नेमणूक केली आहे. तर पालघरचे जिल्हाधिकारी प्रशांत नारनवरे यांची सिडकोच्या सहव्यवस्थापकीय संचालकपदी बदली करण्यात आली आहे.हेही वाचा-

डोंगरी दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाखांची मदत

डोंगरीत ४ मजली इमारत कोसळून १४ जणांचा मृत्यूRead this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा