मुंबईत ३० ते ४० कुत्र्यांवर एका विकृताने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अहमद शाह (६८) असं या विकृताचं नाव आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. 

अहमद कुत्र्याशी असं कृत्य करत असताना एका व्यक्तीने त्याचा व्हिडिओ बनवला. या आधारावर पोलिसांना त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. घटना उघङकीस आल्यावर सर्वत्र संतापाची लाट उमटली होती. सोशल मीडियावर #SorrySheru हा हॅशटॅग ट्रेण्डिंगमध्ये आला. अहमदला अटक झाल्यानंतर त्याने आतापर्यंत ३० ते ४० कुत्र्यांवर बलात्कार केल्याची कबुली दिली आहे.

अहमद शाह हा जुहू गल्लीत राहणारा भाजी विक्रेता आहे. कुत्र्या-मांजरांना खाण्याच्या बहाण्याने तो जवळ बोलवत असे. त्यानंतर त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करत असे. 'बॉम्बे अ‍ॅनिमल राइट्स' नावाच्या एका स्वयंसेवी संस्थेशी संबंधित प्राणी हक्क कार्यकर्ते विजय मोहनानी यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे अहमद शाहला डीएन नगर पोलिसांनी अटक केली. 

विजय मोहनानी यांना स्थानिक व्यक्तीने फोन करून एक व्यक्ती भटक्या कुत्र्यांवर बलात्कार करत असल्याची माहिती दिली होती. त्याने पुरावे म्हणून डिसेंबर 2020 चा एक व्हिडिओ पाठविला होता. तो पाहून विजय मोहनानी यांना आश्चर्याचा धक्का बसला. त्यानंतर त्यांनी डीएन नगर पोलिस ठाण्यात तक्रार केली. 

पोलिसांनी याबाबत सांगितलं की, आरोपीला अशा प्रकारचे दुष्कृत्य करण्याची सवय आहे. याआधी स्थानिक लोकांनी त्याला अनेकवेळा समजही दिली होती.



हेही वाचा -

मुंबईत रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी १६५ दिवसांवर

वरळी सीफेस स्कूल आणि हाजी अली पंपिंग स्टेशनजवळ बोलक्या भिंती