अनैतिक संबधातून धारावीत एकाची गळा चिरून हत्या


अनैतिक संबधातून धारावीत एकाची गळा चिरून हत्या
SHARES

मुंबईच्या धारावी परिसरात आईसोबत असलेल्या अनैतिक संबधावरून ३६ वर्षीय व्यक्तीची मुलानेच हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सचिन कुचीकोवर असे या मृत व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी धारावी पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपीला अटक  केली आहे.

हेही वाचाः- नववर्ष स्वागतासाठी मनसेची मुख्यमंत्र्यांना 'ही' विनंती

धारावीच्या शिवशक्तीनगर परिसरात संक्कया मार्ग येथे सचिन कुचीकोवर हा आपल्या कुटुंबियांसोबत राहतो. त्याच परिसरात आरोपी हा त्यांच्या कुटुंबियांसोबत राहतो. सचिनचे आरोपीच्या आईसोबत अनैतिक संबध असल्याची चर्चा होती. याची कुणकुण आरोपीला लागल्यानंतर त्याने सचिनचा काटा काढायचे ठरवले. रविवारी दुपारी सचिन हा परिसरातील लक्ष्मी स्टोअरमागे असताना. आरोपीने त्या ठिकाणी त्याची वाट अडवली. त्यावेळी दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला आणि वाद विकोपाला गेला. दोघांची भांडण हाणामारीपर्यत पोहचली. त्यावेळी आऱोपीने सचिनच्या गळ्यावर धार धार शस्त्राने वार केले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर धारावी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत सचिनहा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता.

हेही वाचाः- संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना EDची नोटीस

पोलिसांनी सचिनला सायनच्या लोकमान्य टिळक रुग्णालयात नेले असता. सचिनच्या शरीरातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला असल्याचे डाँक्टरांनी घोषीत केले. दरम्यान सचिनच्या बहिणीने दिलेल्या तक्रारीवरून धारावी पोलिसांनी आरोपी विरोधात ३०२, ३०७ भा.द.वि कलमांतर्गत गुन्हा नोंदवला असून पोलिसांनी आरोपीला अटक केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा