Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
53,09,215
Recovered:
47,07,980
Deaths:
79,552
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
37,656
1,657
Maharashtra
5,19,254
39,923

संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना EDची नोटीस

शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ED कडून नोटीस बजावण्यात आल्याची माहिती आहे.

संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना EDची नोटीस
SHARES

शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ED कडून नोटीस बजावण्यात आल्याची माहिती आहे. पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी त्यांना ही नोटीस बजावण्यात आली आहे. तसंच वर्षा राऊत यांना २९ डिसेंबर रोजी ईडी कार्यालयात हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्याचंही समोर आलंय.

'ईडी समन्स बाबतीत मला कल्पना नाही, मला माहीत नाही. ईडी समन्स आलं असेल तर मी स्वतः पत्रकार परिषद घेऊन त्याबाबत प्रसारमाध्यमांना माहिती देईन,' अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली होती. त्यानंतर सोमवारी त्यांनी पत्रकार परिषदेचं आयोजन केलं आहे.

पीएमसी संदर्भात राऊत यांचे आधी काही संबंध होते का याचा खुलासा राऊत करतील का? त्यांनी ईडीला सहकार्य करावं, अशी खोचक प्रतिक्रिया भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी दिली आहे.

तर दुसरीकडे, भाजप नेते आणि आमदार राम कदम यांनीही संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. 'मुंबई पोलीस यंत्रणा वागते त्याचे समर्थन शिवसेना करते आणि ईडी नोटीस आली की सूडाचं राजकारण असं कसं म्हणतात? असा सवाल राम कदम यांनी केला आहे.

विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना नोटीस बजावण्यात आली. तर अगदी अलीकडे शिवसेना आमदार प्रताप सरनाईक आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनाही ईडी चौकशीसाठी हजर राहण्यासाठी सांगण्यात आलं.हेही वाचा

अ‍ॅमेझॉनला धडा शिकवला; 'त्या' मनसे नेत्याकडून कार्यकर्त्यांचं अभिनंदन

टीका करणं एवढेच मनसेचं काम- अनिल परब

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा