SHARE

लोअर परळ - पश्चिम रेल्वेमध्ये क्लार्क म्हणून काम करणाऱ्या राष्ट्रीय जलतरणपटू तनिका धारा हिने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन गुरुवारी आत्महत्या केली. ती लोअर परळ येथील पूनावाला चाळीत भाड्याने राहत होती. तिने घरातील पंख्याला लटकून आपलं जीवन संपवल्याचंही पोलिसांनी सांगितलंय. तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी भायखळा येथील नायर रुग्णालयात पाठवण्यात आलाय. तनिकाने सप्टेंबर 2016 च्या 70 व्या राष्ट्रीय जलतरणपटू स्पर्धेच्या एक मीटर स्प्रिंगबोर्ड स्पर्धेत रौप्य पदक पटकावलं होतं. तर 2015 साली तिरुवनंतपुरममध्ये 35 व्या राष्ट्रीय खेळात तिने कांस्यपदक पटकावलं होतं. तनिकाच्या मित्रांनी आणि शेजारच्यांनी जेव्हा तिच्या घराचा दरवाजा तोडला तेव्हा ती पंख्याला लटकलेल्या अवस्थेत सापडली. नायर रुग्णायलात दाखल केलं असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. तिच्या आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

संबंधित विषय
ताज्या बातम्या