पहिल्याच दिवशी NCB ची धडक कारवाई


पहिल्याच दिवशी NCB ची धडक कारवाई
SHARES

एकीकडे सर्व मुंबईकर नवर्षाचे स्वागत करीत असतानाच, दुसरीकडे नविन वर्षाच्या पहिल्याच दिवशी बॉलिवुडमधील ड्रग्ज वितरणाप्रकरणी तपास करणा-या केंद्रीय्ा अमली पदार्थ विरोधी विभागाने(एनसीबी) दोन मोठ्या कारवाया केल्या. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून मुंबईतील मोठ्या ड्रग्स तस्कराची माहिती एनसीबीला मिळाली आहे. त्याचा शोध सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.

हेही वाचाः- 'शिवशाही' कॅलेंडरवर उर्दू भाषेतील मजकूर

अंधेरी आणि कुर्ला या मुंबईतल्या दोन ठिकाणी एनसीबीने छापा टाकून मोठ्या प्रमाणात एमडी ड्रग्ज हस्तगत केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. याप्रकरणी एकूण तीन ड्रग्ज पेडलर्सला अटक करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.  तर दुसरीकडे मुंबई पोलिसांच्या अंमली विरोधी पथकाने देखील नववर्षाच्या पहिल्याच दिवशी मोठी कारवाई केली आहे. बांद्रा युनिटने ५२ लाख रुपये किंमतीचे २०४ ग्रॅम कोकेन ड्रग्ज जप्त केले असून एका नायजेरियन आरोपीला अटक केली आहे.  कारमध्ये ड्रग्ज घेऊन आला होता हा आरोपी वाकोला सांताक्रुज पूर्व मध्ये पोलिसांना बघून पळून जाण्याचा प्रयत्न करताना पोलिसांनी त्याला अटक केली. तर दुसरीकडे काही ड्रग्ज तस्कर मोठ्या प्रमाणात ड्रग्जची तस्करी करण्यासाठी अंधेरी आणि कुर्ला परिसरात येणार असल्याची माहिती एनसीबीला मिळाली होती.   त्यानुसार, एनसीबीने दोन पथके तयार करीत, या ठिकाणी छापेमार करीत तिघाना अटक केल्याचे एनसीबीने सांगितले

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा