मुंबईत एनसीबीची मोठी कारवाई; टाय, हेल्मेट, स्टेथोस्कोपमध्ये लपवलेले कोटींचे ड्रग्ज जप्त

मुंबईत एनसीबीकडून १३ कोटींचे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहेत.

मुंबईत एनसीबीची मोठी कारवाई; टाय, हेल्मेट, स्टेथोस्कोपमध्ये लपवलेले कोटींचे ड्रग्ज जप्त
(Representational Image)
SHARES

मुंबईत एनसीबीकडून १३ कोटींचे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहेत. मुंबईत ८ ठिकाणी सर्च ऑपरेशन करण्यात आले असून, हार्डड्राईव्ह, स्टेथोस्कोप, सायकल हेल्मेट, बांगड्या, टायमधून या ड्रग्जची तस्करी करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. याप्रकरणी एनसीबीकडून एकूण ६ गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. गेल्या दोन दिवसापासून ही कारवाई सुरु आहे.

गेल्या २ महिन्यापासून ही टोळी सक्रिय झाली होती. विविध कुरियर कंपनीद्वारे हे ड्रग्ज वेगवगळ्या युक्त्या लढवून हार्डड्राईव्ह, स्टेथोस्कोप, सायकल हेल्मेट, बांगड्या, टायमधून पाठविण्यात येणार होते. अमेरिका, ऑस्ट्रेलिया, स्वित्झर्लंड, न्यूझीलँडला हे ड्रग्ज पाठविण्यात येणार होते.

या प्रकरणी केलेल्या कारवाईनंतर एक परदेशी नागरिक ताब्यात असून, त्याच्याकडे अधिक तपास सुरु आहे.

एनसीबी मुंबईनं मुंबईतील अंमली पदार्थ सप्लायर्स आणि पेडलर्सविरुद्धच्या सततच्या मोहिमेंतर्गत मुंबईच्या विविध ठिकाणी अनेक सर्च ऑपरेशन्स सुरू केले आहे. यामधून १० ते १४ डिसेंबरपर्यंत एकूण २.२९६ किलो ऍम्फेटामाइन, ३.९०६ किलो अफू आणि २.५२५ किलो झोल्पीडेम टॅब जप्त करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

एनसीबीची कारवाई

  • NCB मुंबईच्या पथकानं १० डिसेंबर रोजी अंधेरी पश्चिमेकडील स्टेथोस्कोपमध्ये लपवून ठेवलेले ४९० ग्रॅम अॅम्फेटामाइन जप्त केले. ही खेप मुंबईतील डोंगरी येथून निघाली आणि ऑस्ट्रेलियाला गेली होती. एनसीबी मुंबईने याप्रकरणी गुन्हा दाखल केला. या प्रकरणात एका इव्होरियन नागरिकाला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.
  • NCB मुंबईच्या पथकानं १३ डिसेंबर रोजी अंधेरी पश्चिम इथं मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये लपवून ठेवलेले ३.९०६ किलो अफू जप्त केले. ही खेप अंधेरी मुंबई येथून निघाली आणि माले, मालदीव इथं पोहोचणार होती.
  • १३ डिसेंबरला अंधेरी पूर्व इथं अन्नपदार्थ आणि किराणा मालामध्ये लपवून ठेवलेला २.५२५ किलो झोलपीडेम टॅब जप्त केल्या. ही खेप अंधेरी मुंबई येथून निघाली आणि अमेरिकेतील टेक्सास इथं पोहोचवली जाणार होती.
  • अंधेरी पूर्व इथं सायकलिंग हेल्मेट आणि बांगड्यांमध्ये लपवून ठेवलेले एकूण ९४१ ग्रॅम अॅम्फेटामाइन जप्त केले. ही खेप अंधेरी मुंबई येथून निघाली आणि ऑस्ट्रेलियाला जाणार होती.
  • १३ आणि १४ डिसेंबरदरम्यान डोंगरी, मुंबई इथं एकूण ८४८ ग्रॅम अॅम्फेटामाइन जप्त करण्यात आले. जे नळीच्या पाईप आणि टाय बॉक्समध्ये लपवले होते. ही खेप मुंबईतील डोंगरी येथून निघाली आणि दुबई, यूएई आणि न्यूझीलंड इथं सप्लाई केली जाणार होती.
  • १४ डिसेंबरला अंधेरी, मुंबई येथे १ टीबी हार्ड डिस्कमध्ये लपवून ठेवलेले १७ ग्रॅम अॅम्फेटामाइन जप्त केले. ही खेप मुंबईतील अंधेरी येथून निघाली आणि स्वित्झर्लंडला जाणार होती. 
Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा