भावंडांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

 BEST depot
भावंडांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू
भावंडांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू
See all

नेव्हीनगर - विना परवाना पतीसह कार शिकताना महिलेनं दोघा भावंडांना चिरडलं असून त्यात दोघांचाही मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना कुलाब्याच्या नेव्हीनगरमध्ये रविवारी घडली. या प्रकरणी कफ परेड पोलिसांनी पती-पत्नीला अटक केली आहे.

रविवारी दुपारी कुलाबातल्या नेव्हीनगर इथल्या पी 68 इमारतीलगतच्या रस्त्यावर नेव्हीचा कर्मचारी संतोष रॉय (36) आपल्या पत्नीला सेंट्रो कार शिकवत होता. पत्नीकडं वाहन चालवण्याचा परवाना नसताना देखील हे दाम्पत्य कार चालवत होते. अचानक पत्नीचा गाडीवरील ताबा सुटला तिने अक्षांस रवीप्रसाद धानी (13) आणि त्याचा लहान भाऊ अभय रविप्रसाद घ्यानी (7) या दोन्ही भावंडांना चिरडलं. या घटनेची माहिती कफ परेड पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पती-पत्नीला अटक केली. कफ परेड पोलिसांनी या प्रकरणी आरोपी पती-पत्नी विरोधात मनुष्यवधाच्या गुन्ह्याची नोंद केला आहे

Loading Comments