इतक्या किंमतीला विकलं नीरव मोदीचं घड्याळ, वाचाल तर थक्क व्हाल

लिलावात नीरव मोदीचे मनगटी घड्याळ ज्या किंमतीला विकले गेले. त्यात मुंबईत ‘वन बी एचके’ घर येईल.

इतक्या किंमतीला विकलं नीरव मोदीचं घड्याळ, वाचाल तर थक्क व्हाल
SHARES

पीएनबी घोटाळ्यातील आरोपी नीरव मोदी याच्या महागड्या कार आणि मौल्यवान वस्तूंचा आज न्यायालयाच्या परवानगीने  सॅफरनआर्ट संस्थेने प्रभादेवी येथे लिलाव सुरू आहे. या लिलावात नीरव मोदीचे मनगटी घड्याळ ज्या किंमतीला विकले गेले. त्यात मुंबईत ‘वन बी एचके’ घर येईल.

हेही वाचाः-कोस्टल रोडने घेतले दोन पोलिसांचे बळी
घोटाळ्यातील देणेकऱ्याचे पैसे भागवण्यासाठी न्यायालयाच्या परवानगीने नीरवची मालमत्ता विकण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार २७ फेब्रुवारी, ३ मार्चला मौल्यवान वस्तूंचा लिलाव सुरू करण्यात आला. आतापर्यंत लिलावात त्याच्या आलिशान महागड्या गाड्या, नामंकित चित्रकारांच्या पेंटीगचा लिलाव करण्यात आला आहे. त्यातून ५३.४३ कोटी रुपये जमा झाले आहे.  लिलाव करणाऱ्या संस्थेने या या वस्तूंच्या विक्रीचा अनुमान ४१ कोटीपर्यंत वर्तवला होता.  या लिलावात चर्चा झाली ती नीरवच्या महागड्या घड्याळाची नीरवचे ब्रॅन्डेड ‘जीरार्ड-पेरिगेऑक्स ओपेरा वन’या घडाळ्याचा समावेश होता. हे घडयाल ९२.२ लाखांना विकले गेले आहे. विश्वास बसणार नाही तब्बल ३० पट जास्त रुपयांना हे घड्याळ विकले गेले. आतापर्यंतच्या लिलावात एका घड्याळासाठी ऐवढी मोठी बोली लागल्याची ही पहिलीच वेळ असल्याचे सांगितले जाते. तर त्याचे दुसरे जुल्स ऑडेमर्स ग्रँड कॉम्प्लीकेशन’ अॅटोमॅटीक घड्याळ ७८.४ लाखांना विकले गेले आहे. या दोन्ही घडाळ्यांची एकूण किंमत १ कोटी७३ लाख इतकी होते. या किमतीत मुंबईत ‘एक टू बी एचके’ घर येईल. 

हेही वाचाः- महाराष्ट्र CID ची वेबसाईट दहशतवादी संघटनेकडून हॅक

त्याच बरोबर त्याचे एम एफ हुसेनची चे पेटिंग १३ कोटींना विकले गेले. तर त्याची हिरेजडीत  महागडी बॅग १५ लाखांना विकली गेली. तर दुसरी बॅग १७ लाखांना विकली गेली. तर त्याची महागडी रोल्स राॅय कार १.६८ कोटींना विकण्यात आली. 


संबंधित विषय