'ओबीसींनाही हवं 'अॅट्रॉसिटी'चं संरक्षण'


'ओबीसींनाही हवं 'अॅट्रॉसिटी'चं संरक्षण'
SHARES

आझाद मैदान - अॅट्रोसिटी कायद्यात ओबीसी जाती जमातींचा समावेश करण्यात यावा, अशी मागणी ओबीसी एनटी पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे अध्यक्ष संजय कोकरे यांनी केली. ते मुंबईतील मराठी पत्रकार संघात बोलत होते. तसेच यावेळी आगामी हिवाळी अधिवेशनावर दिल्लीतील जंतरमंतर येथे पार्टीतर्फे ओबीसी समाजाचा मोर्चा काढण्यात येणार असून पंतप्रधानांनाही या मागणीचे निवेदन देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसंच 20 ऑक्टोबरला बीड जिल्हा आणि 8 डिसेंबरला नागपूर अधिवेशनावर ओबीसी समाजातर्फे मोर्चा काढण्यात येणार आहे. याशिवाय ओबीसी समाजामध्ये मराठा समाजाला समाविष्ट करू नये, याबाबतचे निवेदन ओबीसी विद्यार्थी परिषदेतर्फे राज्यातील प्रत्येक जिह्याधिकाऱ्यांना देण्यात येणार असल्याचे कोकरेंनी यावेळी सांगितले.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा