जुन्या नोटा बदलण्याच्या नादात नोकरी गमावली


जुन्या नोटा बदलण्याच्या नादात नोकरी गमावली
SHARES

ग्रँट रोड - ग्रॅट रोडचे रेल्वे अधिकारी दीपक कुमार यांनी त्यांच्याकडे असलेल्या 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी रेल्वेचा गल्ला वापरला. मंगळवारी रात्री तिकीट विक्रीची वेळ संपल्यानंतर गल्ल्यात त्यांना शंभराच्या 1500 नोटा दिसल्या. दीपक कुमार यांनी 100 रुपयांच्या नोटा स्वत:च्या खिशात टाकल्या आणि त्या ऐवजी.1000 आणि 500च्या नोटा टाकल्या. दुसऱ्या दिवशी सकाळी शंभराच्या नोटा नसल्याचं समोर आलं. त्याबाबत दीपक कुमार यांच्याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तपास केल्यावर खुलासा झाला. याप्रकारानंतर दीपक कुमार यांना बेजाबबदार वर्तन केल्याप्रकरणी तडकाफडकी निलंबित करण्यात आलं. पश्चिम रेल्वेचे जनंसपर्क अधिकारी गजानन महापूतकर यांनीही याप्रकरणाला दुजोरा दिलाय.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा