आदित्य ठाकरेंना जीवे मारण्याची धमकी; आरोपी अटकेत

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र व राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती.

आदित्य ठाकरेंना जीवे मारण्याची धमकी; आरोपी अटकेत
SHARES

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र व राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. एका ३४ वर्षीय व्यक्तीनं व्हॉट्असअद्वारे आदित्य ठाकरे यांनी धमकी दिली होती. याप्रकणी पोलिसांनी आरोपी जयसिंग राजपूत (३४) याला अटक केली आहे. जयसिंग राजपूतहा दिवंगत अभिनेता सुशांतसिंग राजपूतचा जबरा फॅन आहे.

बंगळुरूच्या पश्चिम प्रादेशिक सायबर पोलिसांनी जयसिंग राजपूतला अटक केली आहे. अभिनेता सुशांतसिंगच्या मृत्युमुळे या आरोपीला अतिशय दु:ख झाल्याने त्याने हे कृत्य केल्याचं प्राथमिक माहितीतून समोर येत आहे.

आरोपी जयसिंग राजपूतनं ८ डिसेंबरच्या मध्यरात्री १२ वाजताच्या सुमारास आदित्य ठाकरे यांना व्हॉट्सअ‍ॅपवर संदेश पाठवला होता. त्यामध्ये, सुशांतसिंगच्या मृत्यूबाबत आरोप करण्यात आले होते. त्यानंतर त्याने आदित्य ठाकरेंना तीन फोनही केले. तसेच, फोनवरुन मेसजद्वारे जीवे मारण्याची धमकीही दिली होती.

याप्रकरणी आदित्य ठाकरे यांच्यावतीने पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांच्या सायबर पथकाने तपास यंत्रणा कामाला लावली. बंगळुरू पोलीस पथकाने १८ डिसेंबर रोजी आरोपीला अटक केल्याचं वृत्त इंडियन एक्सप्रेसने दिलं आहे.

मुंबईच्या सायबर सेल पथकाने आरोपीच्या मोबाईल नंबरवरुन त्याचा शोध घेतला असतो तो बंगळुरू इथं असल्याचं समजलं. त्यानंतर, मुंबई पोलिसांनी बंगळुरू इथं जाऊन आरोपी जयसिंग राजपूत यास अटक केली आहे. याप्रकरणी, आरोपीविरुद्ध विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा