कळवा फाटकाजवळ लोकलमधून पडून एकाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी

दोन महिन्यांपूर्वी डोंबिवली स्थानकातील (Dombivali Station) जीवघेण्या गर्दीने एका तरूणीचा जीव घेतला होता. आता मुंबईतील लोकल ट्रेन (local train) मधील गर्दीचा आणखी एक बळी गेला आहे.

कळवा फाटकाजवळ लोकलमधून पडून एकाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी
SHARES

दोन महिन्यांपूर्वी डोंबिवली स्थानकातील (Dombivali Station)  जीवघेण्या गर्दीने एका तरूणीचा जीव घेतला होता. आता मुंबईतील लोकल ट्रेन (local train) मधील गर्दीचा आणखी एक बळी गेला आहे. बुधवारी मध्य रेल्वेच्या (Central Railway) कळवा-मुंब्रा स्थानकादरम्यान (Kalwa-Mumbra Station) कळवा फाटक येथे ३ प्रवासी लोकमधून पडले. यापैकी एका प्रवाशाचा मृत्यू (death) झाला आहे. तर २ प्रवाशी जखमी झाले आहेत.

जखमींवर कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार सुरु आहेत. जखमी प्रवासी मुंब्रा येथे राहणारेे आहेत. हा अपघात बुधवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास झाला. कल्याणकडून आधीच गर्दीने भरून लोकल आली होती. त्यात कळवा स्थानकात मोठ्या संख्येने प्रवासी चढले. या रेटारेटीत प्रवाशी लोकलबाहेर फेकले गेले. यामधील एका प्रवाशाचा मृत्यू (death) झाला.

याआधीही लोकलच्या गर्दीचे अनेक बळी गेले आहेत. दोन महिन्यांपूर्वी डोंबिवली स्थानकात (Dombivali Station) लोकल पकडलेली चार्मी पासाद (२२) ही तरूणी लोकलमधून पडली. यात तिचा मृत्यू झाला होता. डोंबिवली ते कोपर स्थानकादरम्यान सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास चार्मीने लोकल पकडली. मात्र, प्रचंड गर्दीमुळे चार्मीला आतमध्ये जाता आलं नाही. ती लोकलच्या दरवाजाच्या बाहेर लटकून राहिली. गर्दीच्या रेट्यामुळे कोपर स्टेशनजवळ तोल जाऊन ती पडली. यामध्ये तिचा मृत्यू (death) झाला.हेही वाचा-

'या' नामांकित ट्रॅव्हल्स कंपन्यांना आरटीओचा दणका, ११४ चालकांचे परवाने रद्द
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा