'या' नामांकित ट्रॅव्हल्स कंपन्यांना आरटीओचा दणका, ११४ चालकांचे परवाने रद्द

आरटीओने ४७५ बसेसची तपासणी केली असता. त्यात ११४ बसेसमध्ये अवैध कार्गो, परमिट आणि टॅक्स संपलं असल्याचं निदर्शनास आलं.

'या' नामांकित ट्रॅव्हल्स कंपन्यांना आरटीओचा दणका, ११४ चालकांचे परवाने रद्द
SHARES

 बेशिस्त वाहनचालकांना धडा शिकवण्यासाठी आरटीओ(RTO)ने विशेष मोहिमे अंतर्गत कारवाई सुरू केली आहे. या कारवाईत आरटीओने निता(Neeta), श्रावणी (shravani) सारख्या ११४ नामकिंत बस ट्रॅव्हल्स (tours and travels) चालकांचे परवाने (Licenses ) रद्द केले आहेत. हे चालक बिना परवाना, टॅक्स संपल्यावरही अवैधपणे प्रवासी वाहतूक करत असल्याचे आढळ्यानंतर वाशीप्रादेशिक परिवहन विभागा ‘आरटीओ’ने कारवाईचा बडगा उगारला आहे. 

 हेही वाचाः- शिवसैनिकांनी भाजप कार्यालयाबाहेर लावले आशीष शेलारांचे अर्धनग्न फोटो

नाशिक मार्गावर नुकतीच मालेगाव-देवळा रस्त्यावर एसटी बस-अपे रिक्षा यांच्यात जोरदार धडक होऊन २० जण ठार झाली होती. बसला निकृष्ठ दर्जाचा टायर बसवण्यात आल्यामुळे हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती पुढे आल्यानंतर राज्यातील आरटीओने महामार्गावर प्रवाशांची ने-आण करणाऱ्या खासगी बससेवा चालकांची तपासणी सुरू केली. या मोहिमेअंतर्गत सहा दिसात आरटीओने ४७५ बसेसची तपासणी केली असता. त्यात ११४ बसेसमध्ये अवैध कार्गो, परमिट आणि टॅक्स संपलं असल्याचं निदर्शनास आलं. या सर्व बसेसला ताब्यात घेऊन त्यांची परवानगी रद्द करण्यात आली आणि वाहनचालकांचेही परवाने रद्द करण्यात आले. या कारवाईमुळे वाशी प्रादेशिक परिवहन विभागाच्या कार्यालयासमोर जप्त केलेल्या वाहनांची रांग लागली आहे. यातील बहुतांश खासगी बस पनवेल-सायन महामार्गावर वाशी, नेरुळ, बेलापूर आणि ऐरोली भागातून राज्याच्या कानाकोपऱ्यात जातात. या कारवाईत निता, श्रावणीसारख्या बड्या कंपन्यांच्या ही बसचा समावेश आहे.

हेही वाचाः- कोरोनावर उपचाराचे व्हायरल मेसेज खोटे

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा