प्रियंका सोनी हत्येचा उलगडा

कांदीवली - प्रियंका सोनी हत्येचा तपास लावण्यात कांदीवली पोलिसांना अखेर यश आलंय. या प्रकरणी पोलिसांनी गौतम कुमार गुप्ताला बेड्या ठोकल्यात. पोलिसांनी गौतमकुमार गुप्ताला झारखंडमधून अटक केलीय. मुख्य आरोपी दिनेश वर्मा, त्याची मुलगी आणि पहिली बायको फरार असून पोलीस त्यांचा शोध घोतायेत. 13 नोव्हेंबरला आरोपी गौतम कुमार गुप्तानं दिनेश वर्माच्या मदतीनं प्रियंका सोनीची हत्या केली होती. हत्या केल्यानंतर प्रियांकाचा मृतदेह रेल्वे ट्रॅकवर फेकण्यात आला होता. जेणेकरून हा अपघात वाटेल. मात्र पोलिसांना शवविच्छेदन अहवालामध्ये हा अपघात नसून, हत्या असल्याची माहिती मिळाली.

Loading Comments