ऑनलाईन शॉपिंगच्या नावाखाली ३२ वर्षीय इसमाने २२ हजार लोकांना घातला ७० लाखांचा गंडा


ऑनलाईन शॉपिंगच्या नावाखाली ३२ वर्षीय इसमाने २२ हजार लोकांना घातला ७० लाखांचा गंडा
SHARES

सध्याच्या काळात पैसा इतका महत्त्वाचा झाला आहे की त्यासाठी लोकांची काहीही करायची तयारी असते. मुंबईत अशीच एक घटना समोर आली आहे. जेथे एका ३२ वर्षीय इसमाने ऑनलाईन शॉपिंगच्या नावाखाली लोकांकडून लाखो पैसे उकळून लोकांना लाखोंचा गंडा घालणा-या आरोपीला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे

हेही वाचाः- राज्यात बर्ड फ्लू नियंत्रणात; भीती नको‌!

बनावट शॉपिंग साईटच्या माध्यमातून देशभरातील २२ हजार नागरीकांची फसवणूक केल्याप्रकरणी गुजरातमधील एका तरुणाला सायबर पोलिसांनी अटक केली. आरोपी बहुसंख्य महिलांची फसवणूक केली आहे. आशिष अहिर(३२) असे अटक करण्यात आलेल्या मुख्य आरोपीचे नाव आहे. त्याने लंडनमधून आयटीचे शिक्षण घेतले आहे. आरोपीला गुजरातमधून अटक करण्यात आली असून पोलिसांनी अशा आणखी ११ बनावट संकेतस्थळांची ओळख पटवली आहे. shopiiee.com या संकेतस्थळाबाबत पोलिसांना अनेक तक्रारी आल्या होत्या. याबाबत करण्यात आलेल्या सखोल तपासात आरोपींनी २२ हजार व्यक्तींची ७० लाख रुपयांची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले आहे. या संकेतस्थळांच्या माध्यमातून महिलांचे कपडे, खोटे दागिने, घरगुती वस्तूंची विक्री करण्यात येत होती. फेसबुकच्या सहाय्याने त्याची जाहिरातही करण्यात येत होती. तपासानंतर आरोपी सूरतमधून काम करत असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर आरोपीला अटक करून मुंबईत आणण्यात आले. या संकेतस्थळांबाबत अनेक तक्रार पोलिसांना आल्या होत्या. याप्रकरणी त्याच्या सहका-यांचीही ओळख पटली असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.

फसवणूक करण्यात येणारे आणखी काही संकेतस्थळं

1) https://white-stones.in/,

2) https://jollyfashion.in/,

3) https://fabricmaniaa.com/.

4) https://takesaree.com/,

5) https://www.assuredkart.in,

6) https://republicsaleoffers.myshopify.com/,

7) https://fabricwibes.com/,

8) https://efinancetix.com/,

9) https://www.thefabricshome.com/,

10) https://thermoclassic.site/,

11) https://kasmira.in/

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा