...तर फडणवीसांच्या भूमिकेची चौकशी करणार - अनिल देशमुख

राकेश मारिया यांनी आपल्या पुस्तकात वरिष्ठ पोलिस अधिकारी देवेन भारती यांच्यासह फडणवीसांवर आरोप केले आहेत.

...तर फडणवीसांच्या भूमिकेची चौकशी करणार - अनिल देशमुख
SHARES

राकेश मारिया यांनी आपल्या पुस्तकात वरिष्ठ पोलिस अधिकारी देवेन भारती यांच्यासह फडणवीसांवर आरोप केले आहेत. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली असून, या प्रकरणात देवेंद्र फडणवीस यांची नेमकी काय भूमिका होती याची गरज पडल्यास चौकशी करू, असं म्हटले आहे. त्यामुळे फडणवीस यांच्यासमोरील कटकटी वाढण्याची चिन्हे आहेत.


मुंबईचे माजी पोलिस आयुक्त राकेश मारिया यांनी शीना बोरा हत्याप्रकरणात केलेल्या गौप्यस्फोटानंतर माजी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नावं चर्चेत आले आहे. राकेश मारिया यांनी 'लेट मी से..' पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकाची प्रकाशनाआधीच चर्चा सुरू आहे. प्रचंड गाजलेल्या शीना बोरा हत्याकांड प्रकरणात मारिया यांनी पोलीस अधिकारी देवेन भारती यांच्यासह तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केले आहेत.


मारिया पुस्तकात काय म्हणाले?

मारिया यांनी शीना बोरा प्रकरणी माजी पोलिस आयुक्त जावेद अहमद आणि आणि तेव्हाचे सहपोलिस आयुक्त देवेन भारती यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. 'पीटर मुखर्जी याला याबाबत त्यावेळी विचारले असता, त्याने देवेन भारती यांना माहिती होती असे सांगितले. त्यामुळेच  मारिया यांनी आपल्या पुस्तकात एटीएसचे तत्कालिन अतिरिक्त महासंचालक (एडीजी) देवेन भारती यांच्यावर तपासादरम्यान दिशाभूल केल्याचा ठपका ठेवला आहे. देवेन भारती यांची पीटर मुखर्जी याच्याशी ओळख होती. याची माहिती त्यांनी कधीच उघड केली नाही, असा आरोप त्यांनी केला आहे. शीना बोराच्या हत्येमध्ये पीटरचा सहभाग नव्हता,  अशी चुकीची माहिती कोणीतरी माझ्या नावाने मुख्यमंत्र्यांना दिल्याचा संशय त्यांनी पुस्तकात व्यक्त केला आहे. तर माजी पोलिस आयुक्त  जावेद अहमद यांनी ईदनिमित्त आयोजित कार्यक्रमात पीटर मुखर्जीला आमंत्रित केले होते. त्याबाबत मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी का दुर्लक्ष केले, असा प्रश्नही मारिया यांनी उपस्थित केला आहे.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा