पाकिस्तानचा भारतावर सायबर 'वार'

 Pali Hill
पाकिस्तानचा भारतावर सायबर 'वार'

मुंबई - उरी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणाव निर्माण झाला आहे. सरहद्दीवर युद्धसदृश स्थिती आणि मीडिया व सोशल मीडियावरून दोन्ही देशांत शाब्दिक युद्ध सुरू असतानाच सोमवारी पाकिस्तानने भारतावर सायबर वार केला आहे. पाकिस्तानमधील 'पाक सायबर हॅकर्स' या हॅकर्सनी मुंबईतील शासकीय विधी महाविद्यालयाची वेब साइट हॅक केली आहे. पाकिस्तानी हॅकर्सनी या साइटवर सर्जिकल स्ट्राइकची खिल्ली उडववणारा मजकूर टाकला. मात्र साइट हॅक झाल्याचे समजताच ही साइट तत्काळ बंद करण्यात आली.

Loading Comments