'गोलमाल' सिनेमातील दृश्याप्रमाणे त्याने पोलिसांच्या बोटाचा तुकडाच पाडला

मनोरुग्णाला वारंवार पोलिस बोट दाखवत असल्याने त्या मनोरुग्णाने पोलिसाच्या बोटाचा चावा घेत त्याच्या बोटाचा तुकाडच पाडला.

'गोलमाल' सिनेमातील दृश्याप्रमाणे त्याने पोलिसांच्या बोटाचा तुकडाच पाडला
SHARES
'गोलमाल रिटर्न' या चिञपटात अजय देवगणला वारंवार बोट दाखवल्यास तो त्या व्यक्तीचे बोटच वाकड करत असल्याचे दाखवण्यात आले होते. असाच काहीसा प्रकार नागपाडा येथे पहायला मिळाला. एका मनोरुग्णाला वारंवार पोलिस बोट दाखवत असल्याने त्या मनोरुग्णाने पोलिसाच्या बोटाचा चावा घेत त्याच्या बोटाचा तुकाडच पाडला. बुधवारी राञी  नागपाडा पपिसरात ही घटना घडली असून जखमी पोलिसावर नायर रुग्णालयात उपचार सुरू आहे.


नागपाडा येथे शफिक अहमद सुलेमान (45) हा नग्न अवस्थेत गोंधळ घालत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार त्या ठिकाणी गस्तीवर असलेल्या जनार्दन साखरे यांना त्या विकृताला हटकण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी धाडले. त्यावेळी शफिकला हटकताना साखरे हे वारंवार त्याला बोट दाखवून धाकात ठेवण्याचा प्रयत्न करत होत.
माञ याचाच राग अनावर झालेल्या शफिकने साखरेंच्या न कळत, त्यांच्या बोटाचा चावाच घेतला.


बोटाचा तुकडा पडल्यानंतरच शफिकने साखरेंचे बोट सोडले. या घटनेनंतर वेदनांनी असह्य झालेल्या साखरेंचा हात रक्ताने पूर्णतहा बरबाटला होता. स्थानिकांनी तातडीने या घटनेची माहिती नागपाडा पोलिसांना देत, साखरे यांना उपचारासाठी नायर रुग्णालयात दाखल केले. डाँक्टरांनी साखरे यांच्यासोबत घडलेली घटना ऐकून चकीत झाले. साखरे यांच्या शरीरातून मोठ्या प्रमाणात रक्तस्ञाव झाला असल्याने डाँक्टरांनी त्यांच्या बोटाला टाके मारून जखमेवर औषध उपचार केले आहेत. या प्रकरणी नागपाडा पोलिसांनी त्या मनोरुग्णावर गुन्हा नोंदवून त्याला अटक केली आहे. त्याला गुरूवारी न्यायालयात हजर केले जाणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलिसांनी दिली.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा