चाॅकलेटचं अमिष दाखवून अल्पवयीनवर बलात्कार


चाॅकलेटचं अमिष दाखवून अल्पवयीनवर बलात्कार
SHARES

मुंबईत अल्पवयीन मुलींवरील अत्याचाऱ्याच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यातच वर्सोवा येथे एका ४२ वर्षाच्या नराधमाने चॉकलेटचं अमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी वर्सोवा पोलिसांनी आरोपी रशीद मोहम्मद सोलकर (४२) याला अटक केली आहे.


आरोपीने दिली गुन्ह्याची कबुली

रशीद सोलकर हा पीडित मुलगी राहत असलेल्या परिसरातच राहतो. वासनांध रशीदने सुरुवातीला चाॅकलेटचं आमिष दाखवत पीडित मुलीला आपल्या घरी बोलावले आणि तिच्यावर बलात्कार केला. मुलीनं तीच्या घरी गेल्यानंतर सर्व बाब तिच्या कुटुंबियांना सांगितल्यानंतर त्यांनी वर्सोवा पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपी रशीद विरोधात गुन्हा दाखल केला.


आरोपीला अटक

रशीद विरोधात गुन्हा नोंदवल्यानंतर पोलिसांनी तातडीने त्याला ताब्यात घेतलं. त्याची कसून चौकशी केली असता रशीदनं गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. सध्या पोलीस पुढील कारवाई करत आहेत.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा