पीएनबी प्रकरणात नवा खुलासा, घोटाळा १३ हजार ६०० कोटींवर


पीएनबी प्रकरणात नवा खुलासा, घोटाळा १३ हजार ६०० कोटींवर
SHARES

पीएनबी घोटाळ्याची घोटाळ्याची किंमत दिवसेंदिवस वाढतच आहे. नुकत्याच हाती लागलेल्या माहितीनुसार हा घोटा १२ हजार कोटींवरून आता १३ हजार ६०० कोटींपर्यंत पोहचला आहे. तर आणखी ९४२ घोटाळ्याची माहिती पीएनबीने पोलिसांना दिल्याने या घोटाळ्याची किंमत वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


पीएनबी घोटाळा प्रकरण

पीएनबी बँकेत घोटाळ्याची सुरुवात १० मार्च २०११ साली झाली. व्यापारी निरव मोदीने पीएनबीच्या ब्रेडी हाऊस शाखेतून घोटाळ्याची पहिली हमी मिळवली. त्यानंतर टप्प्याटप्प्याने बँक कर्मचाऱ्यांना हाताशी धरून निरवने ७४ महिन्यांत १२१२ गॅरेटींज मिळवल्या, त्यानंतर निरव आणि मेहुल चौक्सी यांच्या कंपन्यांनी लेटर ऑफ अंडरटेकिंग मिळवत त्याद्वारे परदेशातील भारतीय बँकांच्या शाखांमधून कर्ज घेतले. देशातील दुसऱ्या क्रमांकाची बँक असलेल्या पीनएबीतल्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने निरवने एका दिवसात ५ गॅरेंटीज मिळवल्या, निरवला अखेरचा एलओयू १३ मे २०१७ रोजी जारी करण्यात आला. या सहा वर्षांत निरवच्या समूहाला खरे एलओय़ू जारी केले. त्यातील पहिला एलओय़ू ५ मार्च २०११ ला दिला गेला. तर शेवटचा ६ नोव्हेंबर २०१७ ला देण्यात आला. या एलओयूची वैधता एक वर्ष होती. त्यामध्ये २०१८ च्या जानेवारीचे पेमेंट गेल्या वर्षीच्या फेब्रुवारीला जारी केलेल्या एलओयूच्या बदल्यात केलं होतं. मेहुल चौक्सीच्या गितांजली समूहाने ७०८०.८६ कोटींचा घोटाळा केला आहे. तर उर्वरित रक्कम ही मोदीच्या कंपनीने घेतली आहे.

पीएनबीला या बेकायदा व्यवहाराबाबत मुंबईच्या सर्कल कार्यालयाकडून २३ जानेवारी २०१८ रोजी अहवाल मिळाला. तो २५ जानेवारी २०१८ रोजी बँकेकडे सुपूर्द केला. २९ जानेवारी २०१८ रोजी या गैरव्यवहाराची माहिती रिजर्व बँकेला मिळाल्यानंतर हा गुन्हा उघडकीस आला.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा