
ठाणे रेल्वे स्थानकाच्या पूर्वेकडील (कोपरी) बाजूवरील वाहतूककोंडी टाळण्यासाठी ठाणे वाहतूक पोलिसांनी नो-एंट्री आणि नो-पार्किंग नियम लागू केले आहेत. उपायुक्त (वाहतूक) पंकज शिर्साट यांनी यासंदर्भात अधिसूचना जारी केली असून हे बदल कायमस्वरूपी लागू राहणार आहेत.
ठाणे स्टेशनच्या पूर्वेकडील बाजूस सॅटिस पुलाचे बांधकाम सुरू आहे. या कामामुळे रस्ता अरुंद झाला आहे. याशिवाय, रेल्वे स्टेशन परिसरात दुचाकी पार्किंगमुळे वाहतूककोंडी वाढत आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी टाळण्यासाठी काही मार्गांवर वाहन पार्किंगसाठी वेळेची मर्यादा लागू करण्यात आली आहे. काही ठिकाणी वाहन प्रवेशालाही बंदी घालण्यात आली आहे.
नवीन नियम पुढीलप्रमाणे:
पंजाब नॅशनल बँकेपासून महापालिका फायर ब्रिगेड सेंटरपर्यंत
– सकाळी 7 ते दुपारी 3 वाजेपर्यंत रस्त्याच्या डाव्या बाजूस 100 मीटरपर्यंत पार्किंगला परवानगी
– दुपारी 3 ते रात्री 12 वाजेपर्यंत रस्त्याच्या उजव्या बाजूस पार्किंगला परवानगी
फायर ब्रिगेड सेंटर ते राधाकृष्ण मंदिर रस्ता
– सकाळी 7 ते दुपारी 3 वाजेपर्यंत डाव्या बाजूस 50 मीटरपर्यंत पार्किंग
– दुपारी 3 ते रात्री 12 वाजेपर्यंत उजव्या बाजूस पार्किंग
सिद्धार्थनगर, भीमशक्ती चौकाहून दीपक लस्सी सेंटर रस्त्याने येणाऱ्या वाहनांना
– दुचाकी वगळता इतर सर्व वाहनांना भीमशक्ती चौकात प्रवेश बंदी
दीपक लस्सी सेंटर दुकानाजवळून हसीजा कॉर्नरकडे जाणाऱ्या वाहनांनाही
– पुढे जाण्यास प्रवेशबंदी
हे बदल वाहतूककोंडी कमी करण्यासाठी आणि सॅटिस पुलाच्या कामादरम्यान वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी करण्यात आले आहेत.
हेही वाचा
