नीरवच्या रोल्स राईसची १.७० कोटींना विक्री

आधीच्या लिलावात रोल्स राॅईस घोस्ट वर १.३३ कोटी रुपयांची, तर पोर्शे वर ५४.६० लाख रुपयांची बोली लावण्यात आली होती. परंतु बोली लावणारे डिपाॅझिटची रक्कम भरण्यात असमर्थ ठरल्याने हा लिलाव रद्द करण्यात आला.

नीरवच्या रोल्स राईसची १.७० कोटींना विक्री
SHARES

अंमलबजावणी संचालनालया (ईडी) ने नीरव मोदीच्या १२ पैकी ६ गाड्यांचा मंगळवारी फेरलिलाव केला. या फेरलिलावात मोदीची रोल्स राॅईस घोस्ट ही कार १.७० कोटी रुपयांना, तर पोर्शे ही कार ६० लाख रुपयांना विकण्यात आली.

या आधीच्या लिलावात रोल्स राॅईस घोस्ट वर  १.३३ कोटी रुपयांची, तर पोर्शे वर ५४.६० लाख रुपयांची बोली लावण्यात आली होती. परंतु बोली लावणारे डिपाॅझिटची रक्कम भरण्यात असमर्थ ठरल्याने हा लिलाव रद्द करण्यात आला. 

'या' गाड्यांचीही विक्री

याचसोबत आणखी ३ गाड्यांवरही बोली लावण्यात आली. यापैकी मर्सिडीज बेंज जीएल ३५० कारवर आधी ५३.७६ लाख रुपयांची बोली लावण्यात आली होती. या कारवर आता ४८ लाख रुपयांची बोली लावण्यात आली. होंडा ब्रिओवर आधी ३.९० लाख रुपयांची बोली लावण्यात आली होती, त्या कारवर आता २.३९ लाख रुपयांची बोली लावण्यात आली. तर टोयोटा इनोव्हा कारवर आधी ९.१२ लाख रुपयांची बोली लावण्यात आली होती. या कारवर आता ८.७० लाख रुपयांची बाेली लावण्यात आली. स्कोडा सुपर्ब कारवर आधी ७.०२ लाख रुपयांची बोली लावण्यात आली होती. मात्र पुन्हा या कारवर बोली लावण्यात आलेली नाही. 

या गाड्यांची विक्री करण्याचं कंत्राट ई-कॉमर्स कंपनी एमएसटीसीला देण्यात आलं आहे. त्यानुसार कारसाठी लागलेल्या नव्या बोलीच्या रकमेचा अभ्यास करून कारची विक्री करायची की, नाही याचा निर्णय ही कंपनी घेईल.



हेही वाचा-

शालिमार एक्स्प्रेसमध्ये आढळल्या जिलेटीनच्या ५ कांड्या

जुलैत बाळासाहेबांच्या स्मारकाचं भूमिपूजन



संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा