Advertisement

जुलैत बाळासाहेबांच्या स्मारकाचं भूमिपूजन

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं राष्ट्रीय स्मारक लवकरच पूर्ण होणार आहे. जुलै महिन्यात बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचं भूमिपूजन करण्यात येणार आहे. उद्धव ठाकरे आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय झाला.

जुलैत बाळासाहेबांच्या स्मारकाचं भूमिपूजन
SHARES
Advertisement

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं राष्ट्रीय स्मारक लवकरच पूर्ण होणार आहे. जुलै महिन्यात बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचं भूमिपूजन करण्यात येणार आहे. उद्धव ठाकरे आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय झाला. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे या स्मारकाची निविदा प्रक्रिया लांबली होती. ही प्रक्रिया एमएमआरडीए या जून महिन्यातच पूर्ण करणार आहे. तसंच, पर्यावरण खात्याची देखील परवानगी लवकरच मिळणार असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतील आणि संपूर्ण जगाला प्रेरणादायी ठरेल असं स्मारक लवकरच उभारू, असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं.

संकेतस्थळाचं लोकार्पण

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत महत्वाची बैठक झाली. या बैठकीला राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता, महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी आणि एमएमआरडीएच्या अतिरिक्त आयुक्त सोनिया सेठी उपस्थित होते. भूमिपूजनानंतर स्मारकाच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे. त्याशिवाय ‘बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक’ या संकेतस्थळाचं लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते महापौर निवासस्थानी करण्यात आलं आहे.

राज्य सरकारकडून मदत

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकासाठी ट्रस्टच्या माध्यमातून स्मारकाचं काम करण्यात येणार आहे. तरीही राज्य सरकार स्मारकासाठी हवी ती सर्व मदत करणार, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. त्यामुळं स्मारक कधी बनणार? याकडं शिवसेनेच्या सर्व नेत्यांसह शिवसैनिकांचं लक्ष लागून राहिलं आहे.

विचारांनी लाखोंना प्रेरणा

'शिवसेनाप्रमुखांचे विचार जगाला कायम प्रेरणादायी ठरावे हीच संकल्पना हे स्मारक उभारण्यामागे आहे. शिवसेनाप्रमुखांशिवाय महाराष्ट्राचा विचारच केला जाऊ शकत नाही. महाराष्ट्राचे सामाजिक, राजकीय वैभव या स्मारकाच्या माध्यमातून लोकांना पाहता येईल. शिवसेनाप्रमुखांनी आपल्या विचारांनी लाखो लोकांना प्रेरणा दिलीया विचारांची प्रेरणा स्मारकातून तर मिळेल, त्याशिवाय डिजिटल माध्यम असलेल्या संकेतस्थळाद्वारे संपूर्ण जगापर्यंत पोहोचेल’, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.हेही वाचा -

कादिवलीमध्ये खड्ड्यात पडून ७ वर्षीय मुलाचा मृत्यू

महापालिका कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होणार कापलेलं वेतनसंबंधित विषय
Advertisement