कांदिवलीमध्ये खड्ड्यात पडून ७ वर्षीय मुलाचा मृत्यू

एका निर्माणाधीन इमारतीजवळील खड्ड्यामध्ये पडून ७ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना कांदिवलीमध्ये घडली आहे. आदित्य सिंह असं या मुलाचं नाव आहे.

SHARE

एका निर्माणाधीन इमारतीजवळील खड्ड्यामध्ये पडून ७ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना कांदिवलीमध्ये घडली आहे. आदित्य सिंह असं या मुलाचं नाव असून मंगळवारी संध्याकाळी ५ वाजताच्या सुमारास ही घटना घडल्याचं समजतं आहे. या घटनेनंतर आदित्यला स्थानिकांनी शताब्दी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. परंतु, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याची माहिती रुग्णालयातील डॉक्टरांनी दिली.  

आकस्मिक मृत्यूची नोंद

कांदिवलीमधील गणेश नगर परिसरात आदित्य सिंह हा राहत होता. मंगळवारी आदित्य याच परिसरात एका निर्माणाधीन इमारतीजवळ खेळण्यासाठी गेला असता तिथं असलेल्या खड्ड्यात आदित्य खेळता-खेळता पडला. या प्ररकणी कांदिवली पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. तसंच, 'या खड्ड्याच्या चारही बाजूला कोणतंही बॅरीकेड नसून, साईनबोर्डही नव्हता', असं कांदिवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन पोंडकुळे यांनी सांगितलं.

घटनेचा अधिक तपास

याप्रकरणी, पोलीस अधिक तपास करत आहेत. त्याशिवाय, घटनास्थळावरील स्थानिकांकडून याबाबत माहिती घेत आहेत. तसंच, या निर्माणाधीन इमारतीच्या कंत्राटदाराकडून सुरक्षाव्यवस्थेबाबतची माहिती घेत आहेत.हेही वाचा -

मुंबईतील २९ पूल धोकादायक, १२ पुलांचा वापर पूर्णपणे बंद

माथेरानची मिनी ट्रेन ७ जूनपासून बंदसंबंधित विषय
ताज्या बातम्या