Advertisement

माथेरानची मिनी ट्रेन ७ जूनपासून बंद

मुंबईहून माथेरानला फिरायला जाणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्वाची बातमी आहे. पावसाळ्यातील ४ महिने नेरळ ते माथेरान दरम्यानची रेल्वे सेवा बंद ठेवली जाणार आहे.

माथेरानची मिनी ट्रेन ७ जूनपासून बंद
SHARES

मुंबईहून माथेरानला फिरायला जाणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्वाची बातमी आहे. पावसाळ्यातील ४ महिने नेरळ ते माथेरान दरम्यानची रेल्वे सेवा बंद ठेवली जाणार आहे. प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं हा निर्णय घेण्यात आला असून, ७ जूनपासून त्याची अंमलबजावणी केली जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.


४ महिने बंद

दरवर्षी पावसाळ्यात मुंबईसह राज्यभरातून अनेक रहिवाशी माथेरानला जातात. त्यामुळं प्रवाशांची माथेरानला मिळणारी पसंती पाहता, त्यांच्या सुरक्षेसाठी पावसाळ्यातील ४ महिने नेरळ ते अमन लॉज मिनी ट्रेन बंद ठेवली जाणार आहे. परंतु, माथेरान ते अमन लॉजपर्यंत असणाऱ्या शटल सेवा सुरू राहणार आहेत. त्यामुळं प्रवाशांना या सेवेचा आनंद लुटता येणार आहे.


प्रवाशांची नाराजी

पावसाळ्यात या मार्गावर मोठ्या प्रमाणात दरडी कोसळण्याची शक्यता असते. त्यामुळं ही सेवा ७ जूनपासून बंद ठेवली जाणार आहे. मात्र, महिने मिनी ट्रेनची नेरळ ते माथेरान ही सेवा बंद असल्यामुळं अनेक प्रवाशांनी नाराजी व्यक्त करत आहेत.



हेही वाचा -

भाजपाच्या नव्या फाॅर्म्युल्याने शिवसेना नाराज?



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा