भाजपाच्या नव्या फाॅर्म्युल्याने शिवसेना नाराज?

भाजपाचे मित्रपक्ष देखील भाजपाच्या चिन्हावरच लढतील, असा नवा फाॅर्म्युला भाजपाच्या वतीने महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी परस्पर जाहीर केल्याने शिवसेना नाराज झाल्याची चर्चा रंगली आहे.

SHARE

भाजपाचे मित्रपक्ष देखील भाजपाच्या चिन्हावरच लढतील, असा नवा फाॅर्म्युला भाजपाच्या वतीने महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी परस्पर जाहीर केल्याने शिवसेना नाराज झाल्याची चर्चा रंगली आहे. यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी थेट भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याशीच बोलण्याचं ठरवलं आहे. 

काय आहे जुना फाॅर्म्युला?

लोकसभा निवडणुकीआधी भाजपा आणि शिवसेनेत झालेल्या युतीच्या करारानुसार राज्यात होणाऱ्या विधानसभेच्या २८८ जागांपैकी निम्म्या-निम्म्या जागा म्हणजेच १४४ जागा शिवसेना लढवेल आणि १४४ जागा भाजपा लढवेल असं ठरलं होतं.  

नवा फाॅर्म्युला काय?

परंतु चंद्रकांत पाटील यांनी २८८ जागांपैकी १३५ जागा शिवसेना, १३५ जागा भाजपा लढेल आणि १८ जागा मित्रपक्षांसाठी ठेवण्यात येतील असं परस्पर जाहीर केलं. एवढंच नाही, तर भाजपा मित्रपक्षांना आपल्या चिन्हावरून निवडणूक लढवण्यास तयार करत असल्याचीही चर्चा आहे. तसं झाल्यास भाजपाच्या वाट्याला १५३ तर शिवसेनेकडे अवघ्या १३५ जागा येतील. 

आठवण करून देणार

या नव्या फाॅर्म्युल्यामुळे शिवसेना पक्षनेतृत्व नाराज झाल्याची चर्चा आहे. अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीत जे ठरलं होतं. त्याच्या अगदी विरूद्ध चंद्रकांत पाटील भूमिका घेत असल्याने शिवसेनेचा या नव्या फाॅर्म्युलाला विरोध आहे. म्हणूनच शिवसेनेने थेट शहा यांना निवडणुकीआधीच्या कराराची आठवण करून द्यायचं ठरवलं आहे. हेही वाचा-

तर, राज ठाकरे किंगमेकर ठरतील- प्रकाश आंबेडकर

राधाकृष्ण विखे पाटील यांचा आमदारकीचा राजीनामासंबंधित विषय
ताज्या बातम्या