Advertisement

राधाकृष्ण विखे पाटील यांचा आमदारकीचा राजीनामा

राधाकृष्ण विखे पाटील यांचा मुलगा सुजय विखे हे भाजपाच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवून विजयी झाले आहेत. तेव्हापासून राधाकृष्ण विखे पाटील भाजपात जाणार याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या.

राधाकृष्ण विखे पाटील यांचा आमदारकीचा राजीनामा
SHARES

काँग्रेसचे माजी विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी अखेर मंगळवारी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे त्यांनी राजीनामा सुपूर्द केला. राजीनामा देण्यापूर्वी विखे पाटील यांच्या निवासस्थानी काँग्रेसच्या नाराज आमदारांची बैठक झाली. यावेळी विखे पाटील यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. 


सत्तारही भाजपात?

राधाकृष्ण विखे पाटील यांचा मुलगा सुजय विखे हे भाजपाच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवून विजयी झाले आहेत. तेव्हापासून राधाकृष्ण विखे पाटील भाजपात जाणार याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. मंगळवारी त्यांनी या दृष्टीने एक पाऊल टाकत आमदारकीचा राजीनामा दिला. आता त्यांच्या भाजप प्रवेशाची फक्त औपचारिकता राहिली आहे. विखे पाटलांसोबत आमदार अब्दुल सत्तारही भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे


आमदार नाराज 

विखे पाटलांच्या मुंबईतील निवासस्थानी मंगळवारी काँग्रेसचे नाराज आमदार दाखल झाले. अब्दुल सत्तार, भारत भालके, शिवसेनेचे नारायण पाटील आणि माढाचे खासदार रणजित निंबाळकर यावेळी उपस्थित होते. यावेळी झालेल्या बैठकीत पुढील रणनीतीवर चर्चा करण्यात आली. बैठकीतच विखे पाटील यांनी आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय़ घेतला. हेही वाचा -

निधी चौधरींना वादग्रस्त वक्तव्य भोवलं, पाणीपुरवठा विभागात केली बदली

विधानसभा निवडणुकीसाठी युती कायम राहणार - चंद्रकांत पाटील
Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement