Advertisement

निधी चौधरींना वादग्रस्त वक्तव्य भोवलं, पाणीपुरवठा विभागात केली बदली

निधी चौधरींच्या वक्तव्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेतली असून, त्यांची मुंबई महापालिकेतून मंत्रालयात पाणीपुरवठा विभागात बदली केली आहे.

निधी चौधरींना वादग्रस्त वक्तव्य भोवलं, पाणीपुरवठा विभागात केली बदली
SHARES

महात्मा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त ट्विट केल्याप्रकरणी पालिका उपायुक्त निधी चौधरी यांची बदली करण्यात आली आहेत. निधी चौधरींच्या वक्तव्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेतली असून, त्यांची मुंबई महापालिकेतून मंत्रालयात पाणीपुरवठा विभागात बदली केली आहे. याशिवाय, चौधरी यांना राज्य सरकारकडून कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली आहे.


कारवाईची मागणी

 'गांधींची १५० वी जयंती साजरी केली जात आहे. हीच योग्य वेळ आहे गांधींचा फोटो नोटेवरुन काढून टाकण्यासाठी आणि जगभरातील त्यांचे पुतळे हटवण्यासाठी. आता आपल्याला एक खरी श्रद्धांजली देण्याची गरज आहे. धन्यवाद गोडसे ३०. ०१.१९४८ साठी.', असं ट्वीट निधी चौधरी यांनी १७ मे रोजी केलं होतं. या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी महात्मा गांधींबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या पालिका उपायुक्त निधी चौधरींवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांना पत्र पाठवत केली होती


गंभीर अपमान 

शासकीय सेवेतील एका जबाबदार अधिकाऱ्यानं अशी जाहीरपणं भूमिका घेणं हे लांछनास्पद आहे. त्यामुळं अशा अधिकाऱ्यांवर मुख्यमंत्र्यांनी सक्त कारवाई करावी, असं ट्विट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे. महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात महापुरुषांचा सरकारी अधिकाऱ्यांकडून गंभीर अपमान केला जात आहे. आणि त्याकडं राज्य शासन कानाडोळा करत असल्याची टीकाही शरद पवारांनी केली आहे. त्याशिवाय, या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी निधी चौधरी यांच्या निलंबनाची मागणी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केली होती.हेही वाचा -

शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य, अभिनेत्री पायल रहतोगी पुन्हा वादाच्या भोवऱ्यात

हर्षदा बनली पोलिस अधिकारीRead this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा