Advertisement

तर, राज ठाकरे किंगमेकर ठरतील- प्रकाश आंबेडकर

येणारी विधानसभा निवडणूक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासाठी सुवर्णसंधी असल्याचं मत वंचित बहुजन आघाडीचे समन्वयक प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केलं.

तर, राज ठाकरे किंगमेकर ठरतील- प्रकाश आंबेडकर
SHARES

येणारी विधानसभा निवडणूक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासाठी सुवर्णसंधी असल्याचं मत वंचित बहुजन आघाडीचे समन्वयक प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केलं. राज यांना पुढे अशी संधी मिळेल की नाही हे सांगता येत असल्याने त्यांनी या संधीचा फायदा घ्यावा असा सल्लाही त्यांनी दिला.

जागा जिंकण्याची संधी 

लोकसभा निवडणुकीतील विजयामुळे शिवसेना-भाजपाचा विश्वास वाढला आहे. त्यामुळे युती कायम ठेवत दोन्हीही पक्ष एकत्रितपणे विधानसभा निवडणूक लढवतील. त्यांच्यातील जागावाटपही निश्चित झालं असून शिवसेनेच्या वाट्याला १३५ जागा येतील. त्यामुळे उरलेल्या जागांवर आघाडी घेण्याची मनसेला चांगली संधी आहे. कारण शिवसेना-मनसेचा मतदार हा एकाच विचारांनी बांधलेला आहे. ज्या जागांवर शिवसेना उमेदवार उभे करणार नाही, त्या जागा जिंकण्याची मनसेच्या उमेदवारांना संधी आहे. त्यासाठी राज ठाकरेंनी आतापासूनच तयारी करावी. मनसेच्या वाट्याला चांगल्या जागा आल्यास राज ठाकरे किंगमेकर बनू शकतात, असा दावाही आंबेडकर यांनी केला.  

राष्ट्रवादीचे १० आमदार संपर्कात

याचसोबत, राष्ट्रवादी काँग्रेसचे १० आमदार आपल्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोटही आंबेडकर यांनी केला. तर राज्यातील संपूर्ण काँग्रेस पक्षच आपल्या संपर्कात असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.   



हेही वाचा-

राधाकृष्ण विखे पाटील यांचा आमदारकीचा राजीनामा

कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगाची सुधारित श्रेणी लागू होणार, मंत्रीमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा