Advertisement

महापालिका कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होणार कापलेलं वेतन

चुकीच्या बायोमेट्रिक पद्धतीमुळं पालिकेच्या सुमारे ७० हजार कर्मचाऱ्यांचं वेतन कापून घेण्यात आलं होतं. हे वेतन १० जून पूर्वी खात्यामध्ये जमा करण्याचे आदेश पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी प्रशासनाला दिले आहेत.

महापालिका कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होणार कापलेलं वेतन
SHARES

मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर आहे. कर्मचाऱ्यांना त्यांचं कापलेलं वेतन मिळणार आहे. चुकीच्या बायोमेट्रिक पद्धतीमुळं पालिकेच्या सुमारे ७० हजार कर्मचाऱ्यांचं वेतन कापून घेण्यात आलं होतं. हे वेतन १० जून पूर्वी खात्यामध्ये जमा करण्याचे आदेश पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी प्रशासनाला दिले आहेत.


कर्मचाऱ्यांना विमा लागू

चुकीच्या बायोमेट्रिक पद्धतीमुळं वेतन कपात केल्याचं आढळल्यास सहायक आयुक्त व खातेप्रमुख यांचं वेतन रोखून धरलं जाणार असल्याचा इशारा प्रवीण परदेशी यांनी दिला. तसंच, जानेवारी २०१९ पासून कामावर असून सुद्धा गैरहजेरी दाखविली असेल अथवा रजा दाखविल्या असंल, तर पडताळणी करून त्यांची हजेरी लावण्यात येईल, असंही परदेशी यांनी म्हटलं आहे. तसंत, राज्य शासनाच्या विमा योजनेप्रमाणं मुंबई महापालिकेच्या कामगार कर्मचाऱ्यांना त्वरित विमा लागू केली जाईल. तसंच, १ ऑगस्ट २०१७ पासून ज्या कामगार कर्मचाऱ्यांनी औषादोपचार किंवा शस्रक्रिया केलेली असेल, अशा कामगारांना देय्य बिल देण्यात येईल, असं आश्वासन देखील परदेशी यांनी दिलं.


वेतन कपाती

कर्मचाऱ्यांच्या वेतन कपातीबाबत मुंबई महानगरपालिका कामगार कर्मचारी संघटना समन्वय समितीच्या नेत्यांनी आयुक्त प्रवीण परदेशी यांच्याबरोबर चर्चा केली. या चर्चेवेळी अ‍ॅड सुखदेव काशीद, अ‍ॅड महाबळ शेट्टी, वामन कविस्कर, बाबा कदम, सत्यवान जावकर, अ‍ॅड प्रकाश देवदास, बा. शि. साळवी, सुभाष पवार, दिवाकर दळवी आदी उपस्थित होते. त्यामुळं पालिका कर्मचाऱ्यांना कापलेलं वेतन मिळणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. 



हेही वाचा -

माथेरानची मिनी ट्रेन ७ जूनपासून बंद



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा