नियमांचे उल्लंघन करत दही हंडी साजरी केल्याने ११ गुन्हे


नियमांचे उल्लंघन करत दही हंडी साजरी केल्याने ११ गुन्हे
SHARES

राज्य सरकारने सार्वजनिकरीत्या दहीहंडी उत्सव साजरा करण्यास मनाई केली होती. मात्र, निर्बंध झुगारून अनेक विरोधी पक्षांतील नेत्यांनी दही हंडी साजरी केली. या प्रकरणी मुंबईत ९, तर ठाण्यात २ ठिकाणी गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. बहुतांश गुन्हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांविरोधातील आहेत.

राज्य सरकारनं सार्वजनिकरीत्या दहीहंडी उत्सव साजरा करण्यास मनाई केली होती. मात्र, निर्बंध झुगारून मनसेच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी पहाटेच दहीहंडी साजरी केली. मंगळवारी दुपारीही मनसेच्या कार्यकर्त्यांनी काही ठिकाणी दहीहंडी साजरी करण्याचा प्रयत्न केला.

या प्रकरणी शिवाजी पार्क, काळाचौकी, कस्तुरबा मार्ग, वरळी, साकीनाका, घाटकोपर, भांडुप, खेरवाडी आणि पार्कसाईट आदी नऊ पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात  आले. ‘मातोश्री’जवळ दहीहंडी साजरी करणारे मनसे पदाधिकारी अखिल चित्रे यांना पोलिसांनी अटक केली होती. त्यांना जामिनावर सोडण्यात आले.

मनसे नेते संदीप देशपांडे यांनी मंगळवारी पहाटे दादर भागातील आर. के. वैद्य मार्गावर दहीहंडी साजरी केली. याप्रकरणी पोलिसांनी देशपांडे यांच्यासह अन्य ६ कार्यकर्त्यांविरोधात गुन्हे दाखल केले.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा