रवी पुजारीच्या हस्तकाला अटक

विलेपार्ले - गजाली हॉटेलमध्ये गोळीबार करून धमकावणाऱ्या गँगस्टर रवी पुजारीच्या हस्तकाला खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे. मृत्युंजय दास याला गुन्हे शाखेने वडाळ्याच्या अॅन्टॉप हिल परिसरातून अटक केली आहे. याच्यासोबत सुरेश पुजारी आणि राकेश पुजारी या दोघांनाही अटक केलीय.

गजालीसारख्या नावाजलेल्या हॉटेलच्या मालकाला रवी पुजारीकडून खंडणीसाठी धमक्या येत होत्या. 21 ऑक्टोबरच्या रात्री गजाली हॉटेलमध्ये शिरलेला मृत्यूंजय दास काऊंटरच्या व्यक्तीशी बोलता-बोलता एका चिठ्ठीवर रवी पुजारीचा मोबाईल नंबर लिहून देतो आणि त्याला कॉल करायला सांगतो. पण मनासारखं होत नसल्याचं पाहून मृत्यूंजय संतापतो आणि स्वत:कडची बंदूक काढून फायरींग करतो. पण,  सुदैवाने गोळी काऊंटरवरच्या व्यक्तीला लागत नाही आणि हे पाहून मृत्यूंजय घटनास्थळाहून पळ काढतो. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद होतो.

विलेपार्ले पोलीस, गुन्हे शाखा तसंच खंडणीविरोधी पथक या आरोपींच्या शोधात असतानाच गुजरातवरून यांचे काही साथीदार पकडले गेले. त्यात या गुन्ह्याचाही उलगडा झाला.

Loading Comments