डीएमके पक्षाच्या प्रवक्त्याची हत्या करणाऱ्यास अटक

तामिळनाडूत २०१२ मध्ये राजकीय वादातून आरोपीसह सात जणांनी डीएमकेचे प्रवक्ते एस. आर नागराजन हे सहपत्नीक दर्शनासाठी जात असताना त्यांची हत्या केली. या हत्येनंतर पोलिसांनी प्रकाशसह सात जणांना अटक केली.

डीएमके पक्षाच्या प्रवक्त्याची हत्या करणाऱ्यास अटक
SHARES

तामिळनाडूतल्या डीएमके ( द्रविड मुनेञ कडगम) या पक्षाच्या प्रमुख प्रवक्त्याची हत्या करणाऱ्या फरार आरोपीस मुंबई पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने अॅण्टाॅप हिलमधून अटक केली आहे. प्रकाश पंडियन (३१) असं या आरोपीचं नाव आहे. मागील दोन वर्षांपासून तामिळनाडूचे पोलिस त्याच्या मागावर होते.


आरोपीची हत्या

तामिळनाडूत २०१२ मध्ये राजकीय वादातून आरोपीसह सात जणांनी डीएमकेचे प्रवक्ते एस. आर नागराजन हे सहपत्नीक दर्शनासाठी जात असताना त्यांची हत्या केली.  या हत्येनंतर पोलिसांनी प्रकाशसह सात जणांना अटक केली. अटकेनंतर सात जणांविरोधात पोलिसांनी दोषारोपपत्र दाखल केले. कालांतराने या सात जणांना न्यायालयाने जामिनावर सोडले. आरोपी जामीनावर बाहेर आल्यानंतर नागराजन यांचा बदला घेण्यासाठी डीएमकेच्या कार्यकर्त्यांनी या सातपैकी एकाची हत्या केली. यानंतर तामिळनाडूतील न्यायालयाने इतर सहा जणांना पोलिस संरक्षण दिले.


अटक वाॅरंट 

काही महिन्यानंतर प्रकरण शांत झाल्याचे पाहून सहा जणांना दिलेले संरक्षण पोलिसांनी काढून दिले. हे कळताच डीएमकेच्या कार्यकर्त्यांनी पुन्हा सहा जणांना लक्ष्य करण्यास सुरूवात केली. त्यामुळे भितीपोटी प्रकाश मुंबईला पळून आला. अॅण्टाॅप हिल परिसरात तो ओळख लपवून राहत होता. तामिळनाडूत दोन वर्षापासून नागराजन यांच्या हत्येच्या खटल्यात तो उपस्थित राहिला नाही. त्यामुळे न्यायालयाने त्याच्याविरोधात अटक वाॅरंट काढले. त्यानुसार काही महिन्यापूर्वी तामिळनाडूचे पोलिस मुंबईत तो राहत असलेल्या ठिकाणी त्याचा शोध घेण्यास आले होते. मात्र प्रकाश पोलिसांच्या हाती लागला नाही. 


ताबा तामिळनाडू पोलिसांकडं

या वेळी तामिळनाडू पोलिसांनी मुंबईच्या खंडणी विरोधी पथकाच्या पोलिसांची मदत घेतल्यानंतर प्रकाशला जेरबंद करण्यात यश आलं. तिकडे जिवाला धोका आहे. त्यात पोलिस संरक्षणही काढण्यात आलं आहे. तिकडे मरण्यापेक्षा आत्महत्या करण्यापलीकडे माझाकडे कोणताच मार्ग नसल्याचं प्रकाशने पोलिसांना सांगितलं. सध्या प्रकाशचा ताबा तामिळनाडू पोलिसांना देण्यात आला आहे.



हेही वाचा -

दाऊदचा हस्तक शकील'लंबू'चा हृदयविकाराने मृत्यू

चीनच्या कंपनीचा ईमेल हॅक करून मुंबईतील कंपनीला लाखोंचा गंडा




Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा