टिव्ही कलाकाराचा विनयभंग: राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याला अटक

अंधेरी परिसरात राहणारी पीडित महिला कलाकार पंजाबी सिनेमांमध्ये काम करते. काही दिवसांपूर्वी ती अंबोली परिसरातील '४८ फिटनेस' नावाच्या जीममध्ये व्यायाम करण्यासाठी आली होती. त्यावेळी तिथं उपस्थित असलेल्या विश्वनाथ शेट्टी याने तिचा विनयभंग केल्याची तक्रार पीडितेने अंबोली पोलिस ठाण्यात नोंदवली होती.

टिव्ही कलाकाराचा विनयभंग: राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याला अटक
SHARES

अंधेरीतील एका जीममध्ये महिला टिव्ही कलाकाराचा विनयभंग केल्याप्रकरणी अंबोली पोलिसांनी एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याला बुधवारी अटक केली. विश्वनाथ शेट्टी असं या आरोपीचं नाव आहे. या प्रकरणी पीडित टिव्ही कलाकाराने २० दिवसांपूर्वी अंबोली पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला होता.


काय आहे प्रकरण?

अंधेरी परिसरात राहणारी पीडित महिला कलाकार पंजाबी सिनेमांमध्ये काम करते. काही दिवसांपूर्वी ती अंबोली परिसरातील '४८ फिटनेस' नावाच्या जीममध्ये व्यायाम करण्यासाठी आली होती. त्यावेळी तिथं उपस्थित असलेल्या विश्वनाथ शेट्टी याने तिचा विनयभंग केल्याची तक्रार पीडितेने अंबोली पोलिस ठाण्यात नोंदवली होती.


जामीन फेटाळला

या प्रकरणात अटक टाळण्यासाठी विश्वनाथने जामीन मिळवकरीता सत्र न्यायालयात धाव घेतली. मात्र न्यायालयाने जामीन फेटाळल्याने विश्वनाथ उच्च न्यालयात जामीन मिळवण्याच्या प्रयत्नात होता. मात्र त्या पूर्वीच पोलिसांनी बुधवारी सकाळी त्याला अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली. विश्वनाथ हा एका राजकीय पक्षाचा पदाधिकारी असल्याची माहिती पुढे येत आहे. मात्र तो कुठल्या पक्षाचा पदाधिकारी आहे, हे सांगण्यास पोलिसांनी टाळाटाळ केली.



हेही वाचा-

अभिनेत्री जिनत अमानचा विनयभंग

अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, अत्याचाराची बनवली व्हिडिओ क्लिप



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा