अभिनेत्री जिनत अमानचा विनयभंग


अभिनेत्री जिनत अमानचा विनयभंग
SHARES

७० च्या दशकात अनेक चित्रपट गाजवणारी प्रसिद्ध अभिनेत्री जिनत अमानने नुकतीच एका व्यक्ती विरोधात जुहू पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. सरफराज उर्फ अमर खन्ना याच्या विरोधात तिने तक्रार नोंदवली असून तो जिनत अमानच्या मित्रांपैकी एक आहे.

काही दिवसांपूर्वी दोघांमध्ये बिनसल्याने सरफराजने जिनत अमानला त्रास देण्यास सुरुवात केली. त्यामुळे कंटाळून जिनकने रविवारी सायंकाळी जुहू पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली.


काय आहे प्रकार?

मागील अनेक वर्षांपासून जिनत अमान आणि सरफराज हे एकमेकांचे जवळचे मित्र होते. मात्र २०१७ मध्ये दोघांमध्ये काही कारणास्तव वाद झाला. त्यानंतर जिनत अमानने सरफराजशी बोलणे बंद केलं. पण तरीही सरफराज जिनत अमानला फोन करून तसेच व्हॉट्स अॅपवरून मेसेज करून त्रास द्यायचा. ऐवढ्यावरच न थांबता सरफराजने जिनत अमानच्या जुहू येथील घरात जबरदस्ती घुसण्याचा तीन वेळा प्रयत्न केला. त्यावेळी सरफराजचं सुरक्षा रक्षकाशी वाद झाला होता. वारंवार सरफराजकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून जिनत अमानने रविवारी सायंकाळी जुहू पोलिस ठाण्यात भा. दं. वि कलम ३५४(ड), ५०९ नुसार गुन्हा नोंदवल्याची माहिती पोलिस उपायुक्त परमजित सिंग दाहिया यांनी दिली.

१९७० मध्ये मिस एशिया पॅसिफिक स्पर्धा जिंकल्यानंतर जिनतने 'द ईविल विद इन' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर 'हरे रामा हरे कृष्णा' 'यादो की बारात', 'डॉन', 'रोटी कपडा मकान', 'सत्यम शिवम सुंदरम', 'कुर्बानी' या चित्रपटांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत सर्वांचेच लक्ष वेधून घेतलं.

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा